Palghar LS constituency : पालघरमध्ये भाजपाला मतविभागणीचा लाभ

222
Palghar LS constituency : पालघरमध्ये भाजपाला मतविभागणीचा लाभ

महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदार संघात भाजपा विरुद्ध शिवसेना उबाठा विरुद्ध ठाकूरांची बहुजन विकास आघाडी (बविआ) अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे असून शिवसेना उबाठा आणि बविआ यांच्यातील मतविभागणीचा लाभ भाजपाचे हेमंत सावरा यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Palghar LS constituency)

पोटनिवडणुकीत भाजपा विजयी

पालघर लोकसभा मतदार संघाची स्थापना २००९ मध्ये झाली. २००९ मध्ये पहिल्यांदा बविआचे उमेदवार बळीराम जाधव निवडून आले होते. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेने हा मतदार संघ आपल्या ताब्यात ठेवला. २०१४ मध्ये भाजपाचे चिंतामण वनगा लोकसभेवर निवडून गेले. २०१८ मध्ये वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने राजेंद्र गावीत गावीत यांना तिकीट दिले आणि ते निवडून आले. (Palghar LS constituency)

उमेदवार भाजपाकडे, जागा शिवसेनेकडे

गेल्या लोकसभा निवडणुकीत (२०१९) शिवसेना-भाजपा युती झाली आणि पालघर मतदार संघ जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यावेळी भाजपाकडे उमेदवार होता तर जागा शिवसेनेला गेल्याने केवळ राजकीय तडजोड म्हणून शिवसेनेने भाजपाचे तत्कालीन खासदार गावीत यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारीही दिली. तेव्हा शिवसेना-भाजपा युतीचे गावीत यांना ५.१५ लाख मते पडली तर बविआच्या बळीराम जाधव यांना जवळपास ४.९१ लाख मते मिळाली आणि गावीत यांचा २३,००० च्या फरकाने निसटता विजय झाला. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार सुरेश पाडवी निवडणूक रिंगणात होते पण त्यांना १३,७०० मते मिळाली. (Palghar LS constituency)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : आरोपी भावेश भिंडेवर बलात्कारासह २१ गुन्हे दाखल)

आता जागा भाजपाकडे, गावीत शिवसेनेत 

या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती असली तरी शिवसेनेत फूट पडली आहे आणि मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचादेखील अजित पवार यांचा गट भाजपासोबत आहे. यावेळी जागावाटपात पालघर मतदार संघ भाजपाला गेला असून गावीत शिवसेनेत आहेत. त्यामुळे भाजपाने माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांचे पुत्र हेमंत यांना या मतदार संघातून निवडणुकीत उतरवले. बविआने बोईसरचे स्थानिक आमदार राजेश पाटील तर शिवसेना उबाठाच्या भारती कामडी सावरा यांच्या विरोधात आहेत. (Palghar LS constituency)

विकासाच्या मुद्द्यावर सावरांना मतदान

पालघर लोकसभा मतदार संघातील सहापैकी तीन मतदार संघ बविआच्या ताब्यात आहेत. बोईसारला राजेश पाटील स्वतः, नालासोपारा येथे क्षितिज ठाकूर आणि वसई मतदार संघात हितेंद्र ठाकूर विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. विक्रमगढ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सुनील भुसारा आमदार आहेत तर डहाणू मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले आमदार आहेत. केवळ एका पालघर मतदार संघात शिवसेनेचे श्रीनिवास वनगा महायुतीचे आमदार आहेत. मात्र भाजपाचे विष्णु सावरा यांनी आदिवासी मंत्री असताना केलेली विकास कामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा यांना मतदार विजयी करून लोकसभेत पाठवतील, असा विश्वास भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. (Palghar LS constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.