भारतीय तत्त्वज्ञ आणि धार्मिक सुधारक Debendranath Tagore

213

देबेंद्रनाथ ठाकूर (Debendranath Tagore) हे एक भारतीय तत्त्वज्ञ आणि धार्मिक सुधारक होते. ते ब्राह्मो समाजाचे सक्रिय होते. ते १८४२ मध्ये ब्राह्मो समाजात सामील झाले. पुढे ते १८४८ मध्ये ब्राह्मो धर्माचे संस्थापक झाले. त्यांचे वडील द्वारकानाथ टागोर हे उद्योगपती होते. त्यांच्या राजेशाही जीवनशैलीमुळे लोक त्यांना प्रिन्स म्हणायचे.

तीनशे वर्षांहून अधिक काळ ठाकूर कुटुंब हे कोलकत्यातील प्रमुख कुटुंबांपैकी एक होतं आणि बंगालच्या पुनर्जागरणाच्या काळात त्यांचा प्रमुख प्रभाव मानला जातो. व्यवसाय, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रात या कुटुंबाने भरीव योगदान दिले आहे. देबेंद्रनाथ ठाकूरांना (Debendranath Tagore) १४ मुले होती. नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ ठाकूर हे देखील त्यांचेच सुपुत्र.

(हेही वाचा पश्चिम बंगालमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी ही ममता बॅनर्जींची व्होट बँक; Amit Shah यांचा घणाघात

देबेंद्रनाथ ठाकूर यांचा जन्म १५ मे १८१७ रोजी झाला. वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी ‘तत्वबोधिनी सभा’ स्थापन केली. लोकांना ब्रह्मोधर्माचा धडा देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. या सभेने मूळ धर्मग्रंथ जाणून घ्यायचे आणि त्यात सध्याच्या काळानुसार बदल करुन ज्ञान घ्यायचे. त्यातून नैतिकतेची परंपरा निर्माण झाली. हळूहळू देवेंद्रनाथांची ही सभा लोकप्रिय होऊ लागली आणि काही प्रभावशाली हिंदू सभेचे सदस्य झाले.

१८४७ मध्ये त्यांनी तत्वबोधिनी सभेला प्रतिज्ञा दिली. या प्रतिज्ञेत ब्राह्मो समाजातील प्रत्येक सदस्य दुष्कर्मांपासून दूर राहतील, खऱ्या मनाने देवाची पूजा करतील आणि कौटुंबिक सुखाच्या निमित्ताने ब्राह्मो समाजामध्ये योगदान देतील, असे सांगण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रावर सर्वप्रथम देवेंद्रनाथांनी सही केली होती. १८६५ च्या अखेरीस बंगाल, पंजाब, मद्रास आणि उत्तर-पश्चिम प्रांतांमध्ये ब्राह्मो समाजाच्या ५४ शाखा उघडल्या गेल्या.  देवेंद्रनाथ यांनी समाजात अनेक सुधारणा घडवून आणल्या. विशेष म्हणजे त्यांच्या सर्वच मुलांनी समाजात योगदान दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.