Indias Chief Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी लक्ष्मण यांचं नाव आघाडीवर, लँगर आणि गंभीर यांच्या नावाचीही चर्चा 

Indias Chief Coach : व्ही व्ही एस लक्ष्मण सध्या बंगळुरूतील क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत 

138
Indias Chief Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी लक्ष्मण यांचं नाव आघाडीवर, लँगर आणि गंभीर यांच्या नावाचीही चर्चा 
Indias Chief Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी लक्ष्मण यांचं नाव आघाडीवर, लँगर आणि गंभीर यांच्या नावाचीही चर्चा 
  • ऋजुता लुकतुके

सध्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (Indias Chief Coach) प्रमुख आणि माजी दिग्गज फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यांचं नाव राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सध्या आघाडीवर आहे. ते भारतीय संघात खेळत असताना त्यांचं वर्णन व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण असं केलं जायचं. राहुल द्रविडनंतर (Rahul Dravid) तेच संघाची प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळतील असं बोललं जात आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्याकाळ जून महिन्यात संपतो आहे. (Indias Chief Coach)

अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी द्रविड यांना प्रशिक्षक पदावर राहायचं असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे द्रविड यांची मुदतवाढीची इच्छा नाही, असंच दिसत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. म्हणजे आयपीएलच्या अंतिम फेरीनंतर पुढचा दिवस. (Indias Chief Coach)

(हेही वाचा- Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोलपंपाला आग, ४० तासांनंतरही बचाव कार्य सुरू)

अशावेळी आयपीएलमधील काही यशस्वी प्रशिक्षकांची नावंही भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून घेतली जात आहेत. पण, लक्ष्मण आणि बीसीसीआयचं मागची तीन वर्षं एक नवीन नातं तयार झालं आहे. क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष म्हणून भारत ए तसंच १९ वर्षांखालील भारतीय संघ तयार करण्यात लक्ष्मण यांचा वाटा आहे. शिवाय द्रवि़ड यांच्या नैमित्तिक सुटीच्या कालावधीत त्यांनी प्रशिक्षक म्हणून कामही पाहिलेलं आहे. आशियाई क्रीडास्पर्धा, ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-२० मालिका, इंग्लंडचा दौरा अशा दौऱ्यात त्यांनी भारतीय संघासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी अर्ज केला तर त्यांची निवड नक्कीच होऊ शकते. (Indias Chief Coach)

४९ वर्षीय लक्ष्मण यांच्यानंतर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे गौतम गंभीर आणि जस्टिन लँगर यांच्याही नावाची चर्चा आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारताचा यशस्वी सलामीवीर राहिलेला आहे. सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची बांधणीही त्याने चांगली केली आहे. पण, गंभीर स्वत: या पदासाठी अर्ज करेल का, आणि विराट कोहलीबरोबरचे त्याचे संबंध पाहता बीसीसीआय तो धोका पत्करेल का, असे प्रश्नही उपस्थित होतात.  (Indias Chief Coach)

(हेही वाचा- CRIME: बंगळुरमध्ये २.७४ कोटींचे ड्रग्ज जप्त, ३ परदेशी नागरिकांसह ८ ड्रग्ज तस्करांना अटक)

जस्टिन लँगरने (Justin Langer) अलीकडेच एका मुलाखतीत भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आपली हरकत नाही, असं म्हटलं होतं. ऑस्ट्रेलियाला ॲशेस जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. पण, साडेतीन वर्षं तो भारतीय संघाबरोबर प्रवास करेल का हा प्रश्न आहे. (Indias Chief Coach)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.