South Mumbai LS Constituency : सफाई कामगाराची सून निवडणूक रिंगणात, महापालिका कामगारांमध्ये उत्साह

South Mumbai LS Constituency : दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव या लोकसभा निवडणुकीत उतरल्याने सफाई कामगारांच्या कुटुंबांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

382
South Mumbai LS Constituency : सफाई कामगाराची  सून निवडणूक रिंगणात, महापालिका कामगारांमध्ये उत्साह
South Mumbai LS Constituency : सफाई कामगाराची  सून निवडणूक रिंगणात, महापालिका कामगारांमध्ये उत्साह

विशेष प्रतिनिधी,मुंबई

दक्षिण मुंबईतील महायुतीच्या (South Mumbai LS Constituency) उमेदवार यामिनी जाधव (Yamini Jadhav) या लोकसभा निवडणुकीत उतरल्याने सफाई कामगारांच्या कुटुंबांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यामिनी यशवंत जाधव (Yamini Jadhav) यांच्या सासुबाई या महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात सफाई कामगार म्हणून सेवा निवृत्त झाल्या . महापालिकेच्या ‘बी’ विभागांत त्या सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या आणि स्वत: यशवंत जाधव हेही राजकारणात येण्यापूर्वी आईला मदत करण्यासाठी इमारतींमधील कचरा गोळा करत असत. त्यामुळे यशवंत जाधव (Yamini Jadhav) यांनी स्थायी समिती अध्यक्षपदी विराजमान होताच सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवतानाच त्यांना कोंदड वातावरणातून मोकळ्या हवेशीर वातावरणातील घरात राहता यावे यासाठी आश्रय योजना राबवून या प्रकल्प कामाला गती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या परिवारातील सदस्याला दिल्लीत निवडून पाठवण्यासाठी सफाई कामगारांनी निर्धार केला आहे. (South Mumbai LS Constituency)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार (South Mumbai LS Constituency) संघातून शिवसेना (Shiv Sena), भाजपा (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व मनसे (MNS) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार म्हणून यामिनी यशवंत जाधव (Yamini Jadhav) या निवडणूक रिंगणात असून त्यांच्या समोर मागील दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले उबाठा शिवसेनेचे (UBT) अरविंद सावंत (Arvind Sawant) यांचे आव्हान आहे. मात्र, मागील दहा वर्षांत दक्षिण मुंबईतील ठोस कामे न केल्याने मतदार नाराज आहे. दुसरीकडे शिवसेनेने या मतदार संघातून महापालिकेच्या सफाई कामगाराच्या सुनेलाच उमेदवारी दिली आहे. यामिनी जाधव यांच्या सासुबाई हे महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. महापालिकेच्या ‘बी’ विभागात त्यांनी सेवा निवृत्तीपर्यंत सफाई कामगार म्हणून काम केले. यशवंत जाधव हे राजकारणात प्रवेश करून नगरसेवक झाल्यानंतरही त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली नाही. कारण ज्या नोकरीच्या जोरावर मी मुलांचे पालन पोषण केले, ती नोकरी मी सोडणार नाही असा पावित्रा घेत त्यांनी सेवा निवृत्तीनंतर काम केले. (South Mumbai LS Constituency)

(हेही वाचा- CRIME: बंगळुरमध्ये २.७४ कोटींचे ड्रग्ज जप्त, ३ परदेशी नागरिकांसह ८ ड्रग्ज तस्करांना अटक)

त्यामुळे सफाई कामगारांप्रती यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना आस्था असून यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर सफाई कामगारांच्या अनुकंपा तत्वावरील नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच यासाठी बैठका घेऊन काही कामगारांच्या कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. (South Mumbai LS Constituency)

तसेच मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास व्हावा म्हणून महापालिकेने दहा ते बारा वर्षांपासून घोषित केलेल्या आश्रय योजनेला यशवंत जाधव (Yamini Jadhav) यांनी स्थायी समिती अध्यक्ष होताच गती देण्याचा प्रयत्न केला. सफाई कामगाराला आपल्या कुटुंबातील सदस्य मानणाऱ्या जाधव यांनी त्यांना मोकळ्या हवेशीर आणि प्रशस्त घरांमध्ये राहता यावे यासाठी मुंबईतील ३० ठिकाणच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत राबवण्यास मंजुरी दिली.त्यातील दक्षिण मुंबईतील राजवाडकर स्ट्रीट, वालपाखाडी, फलटन रोड, ६४ जेल रोड,  ४२ जेल रोड, सिध्दार्थ नगर, टँक पाखाडी,  पी जी सोलंकी,  एन एम जोशी मार्ग, शिश महल आदी ठिकाणच्या वसाहतींचा  सामावेश आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या सफाई कामगारांसह इतर वसाहतींमधील कामगारांमध्येही आनंद व्यक्त केला जात आहे. यामिनी जाधव या यापूर्वी नगरसेविका बनल्या, आमदार बनल्या, परंतु आता देशाच्या सर्वोच्च संसदेत पोहोचण्याची संधी आल्याने कामगारांनी मात्र आपल्या कुटुंबातील सदस्याला संसदेत पाठवायची संधी सोडायची नाही असाच निर्धार केला आहे. (South Mumbai LS Constituency)

(हेही वाचा- IPL 2024, DC vs LSG : दिल्लीचा लखनौवर १९ धावांनी विजय. पण, दोन्ही संघांसाठी बाद फेरीचं गणित अवघडच)

आश्रय योजनेंतर्गत दक्षिण मुंबईतील या वसाहतींचा सुरु आहे पुनर्विकास

राजवाडकर स्ट्रीट :  १४० सदनिका

वालपाखाडी : ५५२ सदनिका

फलटन रोड : ५२९ सदनिका

 ६४ जेल रोड : २२५ सदनिका

४२ जेल रोड : १८१ सदनिका

सिध्दार्थ नगर : ६८३ सदनिका

टँक पाखाडी : ३३१ सदनिका

 पी जी सोलंकी : ४४४ सदनिका

 एन एम जोशी मार्ग : ८२ सदनिका

 शिश महल : ३२७ सदनिका

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.