Audi A3 2024 : ऑडी ए३ ची फेसलिफ्ट कार भारतात लाँचसाठी तयार

Audi A3 2024 : ऑडीची सेदान प्रकारातील या कारची किंमतही आहे कंपनीच्या इतर कारच्या तुलनेत किफायतशीर 

147
Audi A3 2024 : ऑडी ए३ ची फेसलिफ्ट कार भारतात लाँचसाठी तयार
Audi A3 2024 : ऑडी ए३ ची फेसलिफ्ट कार भारतात लाँचसाठी तयार
  • ऋजुता लुकतुके

‘खूप साऱ्या प्रिमिअम सुविधा चार दारं असलेल्या कॉम्पॅक्ट कारमध्ये’, असं ऑडी ए३ (Audi A3 2024) या गाडीचं वर्णन ती अमेरिकेत लाँच झाली तेव्हा करण्यात आलं होतं. म्हणूनच ही कार ऑडी ब्रँडची किफायतशीर सेदान कार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रिमिअम कारमधील एंट्री स्तरावरील कारमध्ये ऑडी ए३ चा समावेश होत आहे.  (Audi A3 2024)

(हेही वाचा- CRIME: बंगळुरमध्ये २.७४ कोटींचे ड्रग्ज जप्त, ३ परदेशी नागरिकांसह ८ ड्रग्ज तस्करांना अटक)

या कारला एलईडी हेडलाईट्स तर आहेतच. शिवाय गाडीतील इंटिरियरमध्येही एलईडी स्क्रीन आणि एलईडी दिव्यांचा वापर करण्यात आली आहे. गाडीत आतमध्ये वायरलेज स्मार्टफोन चार्जिंग पॅडही देण्यात आल आहे. ही गाडी प्रिमिअम आणि प्रिमिअम प्लस अशा दोन व्हेरिंयंटमध्ये येते. आणि यात प्रिमिअम प्लस प्रकारात क्रूझ कंट्रोल, लेन किपिंग असिस्टंन्स, मेमरी सीट आणि चावीशिवाय दार उघडण्याच्या प्रिमिअम सुविधा यात आहेत. फेसलिफ्टमध्ये गाडीचा लुक आतून आणि बाहेरून पूर्णपणे बदलण्यात आला आहे. (Audi A3 2024)

या गाडीचं इंजिन २०१ हॉर्सपॉवरचं २.० लीटर, ४ सिलिंडर असलेलं ४० व्होल्ट हायब्रिड इंजिन आहे. १९९८ सीसी इतकी या इंजिनाची क्षमता आहे.  गाडीत स्टँडर्ड ७ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. ही गाडी शून्य ते ६० माईल्सचा वेग सहा सेकंदात गाठू शकते. तर प्लेफूल हँडलिंग फिचर कंपनीने या कारमध्येही कायम ठेवलं आहे. गाडीच्या आत १०.१ इंचांचा इन्फोटेन्मेंट डिस्प्ले आहे. (Audi A3 2024)

(हेही वाचा- Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोलपंपाला आग, ४० तासांनंतरही बचाव कार्य सुरू)

या गाडीची स्पर्धा बीएमडब्ल्यू टू सिरीज ग्रॅन कूप आणि ॲक्युरा इंटिग्रा या गाड्यांशी असेल. भारतात या गाडीची किंमत ३५ लाखांपासून सुरू होईल. (Audi A3 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.