Narendra Modi: जिरेटोप प्रकरणाबाबत प्रफुल पटेल यांनी सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

214
Narendra Modi: जिरेटोप प्रकरणाबाबत प्रफुल पटेल यांनी सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर चढवलेल्या जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे, मात्र या वादावर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ‘X’ स्पष्टीकरण दिले आहे. (Narendra Modi)

मोदींनी वाराणसी मतदार संघाचा अर्ज भरल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांच्या डोक्यावर जिरोटप घालण्यावरून हा वाद सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात जिरेटोपाला मानाचं स्थान आहे. पटेल मोदींच्या डोक्यावर जिरेटोप घालतानाचा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेलांवर टीका केली आहे. जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे, असं शरद पवार गटाने म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024)

यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहे. त्यांच्या आदर्शांवर आणि लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही, यापुढे काळजी घेऊ.

(हेही वाचा – PM Narendra Modi : माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत, पण…; पंतप्रधानांनी मुलाखतीवेळी केलेल्या ‘या’ विधानाची चर्चा )

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी वाराणसीसाठी मतदान होणार आहे. मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांना जिरेटोप भेट दिला. याचा प्रसंगाचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या ५व्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या टप्प्याच्या प्रचारासाठी फक्त काही दिवसच शिल्लक राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे महायुती आणि दुसरकीडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी चुरस महाराष्ट्रात या लोकसभेच्या निवडणुकीत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत बुधवारी, (१५मे) रोड-शो होणार आहे तसेच नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.