मुंबई महापालिकेचा सफाई कामगार हा गरीब असला तरी तो किती प्रामाणिक असतो हे पुन्हा एकदा केनेडी ब्रिजवरील घटनेने दाखवून दिले आहे. सकाळी या पुलाच्या शेजारील रस्त्याची झाडलोड करताना तब्बल १५ तोळे सोने महापालिकेच्या डि विभागातील सफाई कामगाराला सापडले. मात्र, हे पडलेले सोने परस्पर लपवून ठेवत यांचा ठावठिकाणाही एखाद्याने लावू दिला नसता, परंतु महापालिकेच्या प्रामाणिक सफाई कामगाराने हे सोने आपल्या सफाई चौकीत नेवून पोलिसांना याची कल्पना देत त्यांच्या स्वाधीन केले. (BMC)
महापालिकेच्या ग्रॅटरोड येथील डि विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार सुनील काशिनाथ कुंभार हे रविवारी १२ मे रोजी रस्त्याची सफाई करत असताना महर्षी कर्वे रोडवरील केनेडी पुलाजवळ सोन्याच्या बिस्कीटाचा तुकडा आणि एक काही भाग अशाप्रकारे सोने सापडले. त्यांनी या सापडलेल्या सोन्याची वस्तू चौकीतील मुकादम किशोर जीतिया व बाळाराम जाधव यांना आणून दिले आणि त्यानंतर त्यांनी याची माहिती स्थानिक डी.बी. रोड पोलीस स्टेशनला दिले. त्यानंतर या पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक डावरे यांच्या ताब्यात या सोन्याच्या वस्तू दिल्या. (BMC)
(हेही वाचा – PM Narendra Modi : माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत, पण…; पंतप्रधानांनी मुलाखतीवेळी केलेल्या ‘या’ विधानाची चर्चा)
मात्र, या सोन्याच्या वस्तू सोने व्यापाऱ्याने दागिने घडवण्यासाठी कारागिराला दिले होते आणि त्या कारागिराकडून या वस्तू पडल्या होत्या अशी माहिती मिळाली असल्याचे या मुकादम यांनी सांगितले. विशेष म्हणजे सुनील कुंभार हा अत्यंत गरीब असून त्याचे घर पक्केही नाही. रस्त्याच्या शेजारी कच्च्या झोपडीत तो राहत असून एवढा गरीब असतानाही त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल महापालिकेच्या कामगार आणि अधिकाऱ्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community