बीचीए म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे. पण मुंबईत कोणते कॉलेजेस याविषयी चांगले शिक्षण देतात हे माहित नाही. तर काळजी करु नका विद्यार्थ्यांनो… आम्ही तुम्हाला मुंबईतील टॉप बीसीए महाविद्यालयांची माहिती देणार आहोत. जेणेकरुन बीसीए चे शिक्षण घेण्यात आणि कॉलेजची निवड करण्यात तुम्हाला मदत होईल. (BCA Colleges In Mumbai)
चला तर जाणून घेऊया मुंबईतील सर्वोत्कृष्ट बीसीए महाविद्यालयांबद्दल :
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एनआयएम) :
हे महाविद्यालय उत्कृष्ट प्लेसमेंटसाठी ओळखले जाते. येथे रु. ५८,७०० शुल्कात BCA प्रोग्राम प्रदान केला जातो. विशेष म्हणजे मुंबईतील हे प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. (BCA Colleges In Mumbai)
डॉ. बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्स :
या कॉलेजचे अभ्यासक्रम शुल्क रु. ३८,००० आहे. हे महाविद्यालय पायाभूत सुविधांसाठी ओळखले जाते. सुंदर कॅम्पस आणि इथली शिक्षण प्रणाली देखील उत्कृष्ट आहे. (BCA Colleges In Mumbai)
(हेही वाचा – Narendra Modi: जिरेटोप प्रकरणाबाबत प्रफुल पटेल यांनी सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…)
श्रीमती. पी.एन. दोशी महिला महाविद्यालय :
रु. २५,८४० एवढ्या कमी शुल्कात बीसीए अभ्यासक्रम प्रदान केला जातो. हे महाविद्यालयाचे प्राध्यापक चांगले आहेत. इथला शैक्षणिक दर्जा देखील उत्तम आहे. हे महिला महाविद्यालय असल्यामुळे बाहेरुन येणार्या मुलींसाठी हे एक सुरक्षित असे शैक्षणिक ठिकाण आहे. (BCA Colleges In Mumbai)
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ (एसएनडीटी) :
एसएनडीटी हे मुंबईतील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक असल्यामुळे इथल्या शैक्षणिक दर्जाबद्दल आणि सुरक्षित वातावरणाबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. केवळ रु. ३०,००० मध्ये इथे उत्तम दर्जाचा अभ्यासक्रम प्रदान केला जातो. इथल्या विद्यार्थ्यांना नोकरीची चांगली संधीही मिळते. (BCA Colleges In Mumbai)
केपीबी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स :
हे बीसीए साठी विशेष महाविद्यालय नसले तरी इथे बीसीएचे शिक्षण प्रदान केले जाते. तसेच इथली शैक्षणिक प्रणालीही उत्तम आहे आणि विशेष म्हणजे प्लेसमेम्तची चांगली संधी उपलब्ध होते. (BCA Colleges In Mumbai)
एमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई :
एमिटी युनिव्हर्सिटीची खासियत म्हणजे इथली प्लेसमेंट प्रणाली खूपच सक्रिय आणि लोकप्रिप आहे. हे महाविद्यालय प्रचंड प्रशस्त असून रु. १,६०,००० मध्ये इथे अभ्यासक्रम दिला जातो. शुल्क अधिक असले तरी शैक्षणिक गुणवत्तेची हमी देता येते. (BCA Colleges In Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community