दिल्लीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा उमेदवारांचा प्रचार आक्रमक होत चालला आहे. ग्राउंडवरच नव्हे, तर सोशल मीडियावरही एकमेकांवर वरचढ होऊन स्पर्धकाला मात देण्याची लढाई सुरू झाली आहे. भाजपाच्या बांसुरी स्वराज आणि काँग्रेसचे कन्हैय्या कुमार यांच्यातही लढाई सुरू झाली आहे, असे म्हटले, तरी चुकीचे होणार नाही. (Bansuri Swaraj)
दिल्लीत २५ मे ला मतदान
तसे बघितले तर, दिल्लीतील सात जागांसाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. दिल्लीत सहाव्या टप्प्यात अर्थात २५ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. आता २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान आहे. त्यानंतर २५ मे रोजी दिल्लीतील सात जागांसाठी निवडणूक होईल. (Bansuri Swaraj)
निवडणुकीचा प्रचार आक्रमक झाला
असे असले तरी, दिल्लीत निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे आणि प्रचाराने आक्रामक रूप धारण केले आहे. केवळ ग्राउंडवरच नव्हे, तर सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांमध्ये लढाई चालू झाली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि जास्तीत जास्त लोकांचे लाईक्स मिळविण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जबरदस्त खडाजंगी सुरू झाली आहे. (Bansuri Swaraj)
सोशल मीडियावर लाईक्स मिळविण्याची लढाई
सोशल मीडियाच्या लढाईत वर्चस्वाची स्पर्धा कुणात रंगली असेल, तर ती भाजपाच्या उमेदवार बांसुरी स्वराज आणि काँग्रेसचे कन्हैय्याकुमार यांच्यात. कधी कन्हैया यांना जास्त लाईक्स मिळत आहे, तर कधी बांसुरी स्वराज यांना ! त्यांच्या दोन्ही सोशल मीडिया हँडलवर लाखो लोक प्रमोशनल व्हिडिओ पाहत आहेत. (Bansuri Swaraj)
(हेही वाचा – मुंबईतील सर्व रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याची CM Eknath Shinde यांची ग्वाही)
भाजपाच्या बांसुरी स्वराज यांची घोडदौड
भाजपाच्या बांसुरी स्वराज यांच्या इंस्टाग्रामवर ७ एप्रिल रोजी अपलोड करण्यात आलेला रील ३६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. ‘विकास भारत का संकल्प’ या शीर्षकासह अपलोड केलेल्या या व्हिडिओला १.३७ लाख लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय ‘वयाच्या पाचव्या वर्षी आईकडून शिव तांडवचे सोळा श्लोक शिकले’ या शीर्षकासह १ एप्रिल रोजी अपलोड केलेला व्हिडिओही २७ लाख लोकांनी पाहिला असून त्याला १.३३ लाख लाईक्स मिळाले आहेत. १.२५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले इंस्टाग्राम अकाउंट मुलाखती, प्रमोशनल रील्स इत्यादींच्या माध्यमातून दररोज सरासरी पन्नास ते सत्तर हजार व्ह्यूज मिळवत आहे. (Bansuri Swaraj)
कन्हैय्या कुमार मागे
रविवारी कन्हैया कुमारच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘दम है कितना दमन में तेरे, देख लिया है देख लेंगे’ शीर्षक असलेली एक रील पोस्ट करण्यात आली. अवघ्या २४ तासांत ही पोस्ट १५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आणि १.२५ लाख लाईक्स मिळाले. सध्या या रीलला २१ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १.५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय ५ मे रोजी ‘न्याय का आरंभ’ या शीर्षकासह अपलोड केलेल्या रीललाही समर्थकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. १० दिवसांत २४ लाख व्ह्यूज आणि ३.७० लाखांहून अधिक लाईक्ससह हा व्हिडिओ कन्हैय्या कुमार यांच्या अकाउंटचा दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे. (Bansuri Swaraj)
कमलजीत, कुलदीप, मनोज, राज यांना २० हजार लाईक्स
भाजपाच्या उमेदवार कमलजीत सेहरावत (पश्चिम दिल्ली) आणि कुलदीप कुमार (पूर्व दिल्ली) यांनाही सोशल मीडियावर लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना कन्हैया कुमार आणि बांसुरी स्वराज एवढे लाईक्स मिळालेले नाहीत. भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर या उमेदवारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. लाखो चाहत्यांनी पाहिले आहेत आणि हजारो लाईक्स मिळाले. सध्या त्यांना प्रत्येक व्हिडिओला सरासरी २० हजार व्ह्यूज मिळत आहेत. (Bansuri Swaraj)
इंस्टाग्रामवर व्ह्यूज मिळाले
बन्सुरी स्वराज ३६ लाख (७ एप्रिल)
कन्हैया कुमार २४ लाख (५ मे)
मनोज तिवारी १२ लाख (२५ एप्रिल)
कुलदीप कुमार ३.५ लाख (२७ एप्रिल)
कमलजीत सेहरावत २.२ लाख (२७ एप्रिल)
उदित राज २ लाख (५ मे)
प्रवीण खंडेलवाल १.६ लाख (८ मे)
सोमनाथ भारती २ लाख (४ मे)
सहिराम पहेलवान ५१ हजार (१३ एप्रिल)
हर्ष मल्होत्रा २९ हजार (९ मे)
रामवीर सिंग बिधुरी १८ हजार (१३ मे)
महाबळ मिश्रा १२ हजार (१२ मे)
योगेंद्र चंडोलिया ३००० (११ मे) (Bansuri Swaraj)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community