Ghatkopar Hoarding Accident : सुटे भाग व राडारोडा हटविण्‍याचे काम युद्ध पातळीवर सुरु

महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसेच बाह्य यंत्रणा आपसात समन्वय राखून अव्याहतपणे कार्यरत आहेत.

153
Ghatkopar Hoarding Accident : माजी पोलीस आयुक्तांचा निकटवर्तीय अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून दुर्घटना झालेल्या ठिकाणी कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले आहेत. या सुट्या भागांसह राडारोडा हटविण्‍याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसेच बाह्य यंत्रणा आपसात समन्वय राखून अव्याहतपणे कार्यरत आहेत. दरम्‍यान, या दुर्घटनेत दुर्देवाने १४ जण मृत्‍युमुखी पडले, तर ७४ जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्‍यात यश आले आहे. घटनास्थळी पेट्रोल पंप असल्याने इंधन, गॅससारख्‍या ज्‍वलनशील पदार्थांच्‍या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे. आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगली जात आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात सोमवार, दिनांक १३ मे २०२४ रोजी सायंकाळी जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून दुर्घटना घडली. १२० फूट लांब आणि १२० फुट रूंदीचा जाहिरात फलक वाऱयाच्या वेगामुळे जवळच असणा-या पेट्रोल पंपाच्‍या छतावर कोसळला. दुर्घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाचे पथक तत्‍काळ घटनास्‍थळी दाखल झाले. बुधवारी १५ मे २०२४ रोजीही महानगरपालिकेसह, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसेच बाह्य यंत्रणा घटनास्‍थळी अव्याहतपणे कार्यरत आहेत. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणारच; तेव्हा मला बाळासाहेब आठवतील; PM Narendra Modi काय म्हणाले?)

घटनास्थळी हे आहेत कार्यरत 

मुंबई अग्निशमन दलामार्फत घटनास्थळी १२ फायर इंजिन, २ आरव्‍ही, १ सीपी, १ एचपीएलव्‍ही, १ डब्‍ल्‍यूक्‍यूआरव्‍ही, १ एमएफटी, १०८ अणीबाणी रुग्‍णसहाय्य सेवेच्‍या २५ रुग्‍णवाहिका तर, १ प्रमुख अग्निशमन अधिकारी, २ उप प्रमुख अग्निशमन अधिकारी, ५ वरिष्ठ केंद्र अग्निशमन अधिकारी, ६ केंद्र अग्निशमन अधिकारी तैनात आहेत. तर, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्‍त, १ सहायक आयुक्‍त, १ कार्यकारी अभियंता, ३ सहायक अभियंता, १ कनिष्‍ठ अभियंता, २ मुकादम, ७५ कामगारांसह २५ वैद्यकीय अधिका-यांचे पथक जीवरक्षक उपकरणांसह घटनास्‍थळी तैनात आहेत. १० जेसीबी, १० ट्रक, ५ पोकलेन, २ खाजगी गॅस कटर्स टिम, २ हायड्रोलीक क्रेन्‍स, २ हायड्रा क्रेन्‍स, ३ वॉटर टॅंकर्स , मेट्रो व एमएमआरडीएचे ५० कामगार, १० आपदा मित्र असे मनुष्‍यबळदेखील कार्यरत आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

दुर्घटना झालेल्या ठिकाणी कोसळलेल्या फलकाचे प्रारंभी सुटे भाग करण्यात आले. या सुट्या भागांसह राडारोडा हटविण्‍याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्‍यान, पेट्रोल पंपाची साठवण क्षमता ४० हजार लीटर पेट्रोल, ३० हजार किलो गॅस आणि ३० हजार लीटर डिझेल इतकी असून या ज्‍वलनशील पदार्थांच्‍या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे. गॅस कटरने फलकाचे सुटे भाग करताना आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष मनुष्यबळाच्या सहाय्याने खबरदारी बाळगली जात आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.