काँग्रेसला देशाच्या बजेटमधील १५ टक्के भाग मुसलमानांवर खर्च करायचाय; PM Narendra Modi यांचा आरोप

काँग्रेस तुमची संपत्तीही हिसकावून त्यातील हिस्सा मुसलमानांना वाटणार आहे. मोदी ना धर्माच्या आधारावर बजेट वाटू देणार, ना धर्माच्या नावावर आरक्षण देणार. वंचितांचा जो अधिकार आहे मोदी त्यांच्या चौकीदार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

148
काही वर्षांपूर्वी काँग्रेसने धर्माच्या आधारावर बजेटचे वितरण करण्यावर हिरवा झेंडा दाखवला होता. बजेटचे एक प्रकारे तुकडे करणे हा किती खतरनाक विचार आहे. काँग्रेससाठी अल्पसंख्यांकांची मतपेटी प्रिय आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांनी देशातील बजेटमधील १५ टक्के केवळ मुसलमानांवर खर्च व्हावे, असा विचार मांडला होता, पण भाजपच्या विरोधामुळे हे झाले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला.

काँग्रेस तुमची संपत्तीही हिसकावून घेणार   

बुधवार, १५ मे रोजी नाशिक येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. आम्ही सर्वसामान्यांना सुविधा देताना कुणाची जात आणि धर्म पाहत नाही. पण काँग्रेसची नियत काय आहे? काँग्रेसचे धोरण आहे की, देशाच्या बजेटमधील १५ टक्के हिस्सा केवळ अल्पसंख्यांकांवर खर्च व्हावे म्हणजे धर्माच्या आधारावर वितरण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आता हे सगळे जुने निर्णय पुन्हा आणायचा विचार काँग्रेसचा सुरु आहे. काँग्रेस तुमची संपत्तीही हिसकावून त्यातील हिस्सा मुसलमानांना वाटणार आहे. मोदी ना धर्माच्या आधारावर बजेट वाटू देणार, ना धर्माच्या नावावर आरक्षण देणार. वंचितांचा जो अधिकार आहे मोदी त्यांच्या चौकीदार आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने काम करणारे आहोत. ही निवडणूक पंतप्रधान निवडण्यासाठी आहे, असा पंतप्रधान जो ताकदवान भारत बनवण्यासाठी कठोर निर्णय घेणारा असावा, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

६० लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला 

मी एक गॅरंटी घेतली आहे, ७० वर्षांपेक्षा वयस्क नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत देणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांवर होणार खर्च कमी होईल आणि तरुण, महिला यांच्यावर खर्च होऊ शकतो. हे आमचे सरकार आहे, ज्यांनी पाहल्यांदा कांद्याचा बफर स्टोक करण्याचा निर्णय घेतला. ६० लाख मेट्रिक टन कांदा सरकारने खरेदी केला, त्यातून बफर स्टॉक बनवला. कांद्यावरील निर्यात बंदी हटवली, मागील दिवसांत २२ हजार मेट्रिक टन कांदा निर्णयात झाला आहे, आता कांद्याच्या वाहतुकीवर सवलत देण्यात येणार आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.