आसामला पाकिस्तानात नेण्याचा डाव उलथवून टाकणारे महान आदिवासी नेते Bhimbor Deori

स्वातंत्र्यसैनिक आणि वकील म्हणून भीमबोर देवरी यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.

257
आसामला पाकिस्तानात नेण्याचा डाव उलथवून टाकणारे महान आदिवासी नेते Bhimbor Deori

भीमबोर देवरी (Bhimbor Deori) हे आसाम राज्यातील एक आदिवासी नेते होते. त्यांचा जन्म १६ मे १९०३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोदाराम देवरी आणि आईचे नाव बजोती देवरी असे होते. देवरी हे २१-२३ मार्च १९४५ रोजी तयार करण्यात आलेल्या “खासी दरबार हॉल रिझोल्यूशन” चे मुख्य शिल्पकार होते. (Bhimbor Deori)

या ठरावामध्ये असे नमूद करण्यात आले होते की वेगवेगळी वांशिक ओळख असलेल्या विविध नेत्यांनी आपली भारतभूमी इंग्रजांच्या तावडीतून परत मिळवण्याचा संकल्प करण्यात आला होता. देवरी यांनी १९३३ मध्ये General Secretary of Assam Backward Plains Tribal League च्या स्थापनेत मदत केली. (Bhimbor Deori)

(हेही वाचा – Thane LS Constituency : ठाण्यात शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला!)

स्थानिक आसामी लोकांना जमिनीचे वाटप केले जावेत आणि सरकारने जमीन महसुलाची माफी द्यावी आणि अन्याय करु नये, असे त्यांचे (Bhimbor Deori) स्पष्ट मत होते. मार्च १९४३ मध्ये आसाम विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, त्यांनी अयोग्य जनसाक्षरता मोहिमांवर टीका केली. तसेच त्यांनी आसाम प्रांताचा भारताच्या प्रजासत्ताकात समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली व आसामचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्याची ब्रिटिश व्हाइसरॉयची योजना त्यांनी नाकारली. स्वातंत्र्यसैनिक आणि वकील म्हणून भीमबोर देवरी यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. (Bhimbor Deori)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.