Khadakwasla Dam : केवळ ६.७२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता संपली की लगेचच पाणीकपात लागू होण्याची चिन्हे आहेत.

257
Khadakwasla Dam : केवळ ६.७२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीत केवळ ६.७२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यासाठी १५ जुलैपर्यंतचे पाणी आणि शेतीसाठीचे आवर्तन व बाष्पीभवन असे गणित साध्य करायचे असल्याने पुण्यातील पाणीकपात अटळ बनली आहे. (Khadakwasla Dam)

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता संपली की लगेचच पाणीकपात लागू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, तूर्तास पाणीकपात होणार नाही, असा दावा पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, भामा आसखेड, पवना या सहा धरणांमधून पाणीपुरवठा होतो. यामध्ये खडकवासला धरण साखळीवर शहराचा बहुतांश भाग अवलंबून आहे. (Khadakwasla Dam)

(हेही वाचा – POK भारताचा भाग; १३० कोटींचा देश कोणाच्या भीतीने हक्क सोडणार नाही; Amit Shah यांनी सुनावले)

गतवर्षी पाऊस कमी पडल्याने धरणे शंभर टक्के भरू शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर धरणसाठ्याचा १५ जुलैपर्यंत काटेकोर वापर करण्याच्या निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. मात्र, आता वाढत्या उकाड्यामुळे वाढलेली पाण्याची मागणी आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्याने खालावत असून, त्यामुळे पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पुण्यात पाणीकपात लागू करावी लागणार आहे. (Khadakwasla Dam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.