North West LS Constituency कोणीही जिंकले तरी, विजय शिवसेनेचाच!

एका बाजुला दोन टर्म खासदार असलेल्या गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर आणि ३५ वर्षे राजकारणात असलेल्या तसेच नगरसेवक, आमदारासह मंत्री पद भुषवणारे रविंद्र वायकर हे निवडणूक रिंगणात उतरल्याने दोघांमध्ये प्रचंड चुरस निर्माण करणारी निवडणूक ठरणार आहे.

293
North West LS Constituency कोणीही जिंकले तरी, विजय शिवसेनेचाच!
  • सचिन धानजी,मुंबई

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून (North West LS Constituency) शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे अमोल किर्तीकर यांच्यासह तब्बल २१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात असल्याचे पहायला मिळत आहे. एका बाजुला दोन टर्म खासदार असलेल्या गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर आणि ३५ वर्षे राजकारणात असलेल्या तसेच नगरसेवक, आमदारासह मंत्री पद भुषवणारे रविंद्र वायकर हे निवडणूक रिंगणात उतरल्याने दोघांमध्ये प्रचंड चुरस निर्माण करणारी निवडणूक ठरणार आहे. मात्र, या लोकसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेचे दोन आमदार असून उर्वरीत चारही आमदार हे भाजपा आणि शिवसेनेचे असल्याने वायकर यांचे पार पारडे जड आहे. (North West LS Constituency)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व सहा विधानसभा क्षेत्र असून या मतदार संघातून शिवसेनेकडून रविंद्र वायकर यांना शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर करेपर्यंत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी अर्ज भरेपर्यंत प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली होती. अमोल किर्तीकर हे उबाठा शिवसेनेकडून उमेदवार असले तरी त्यांचे पिता आणि माजी खासदार गजानन किर्तीकर हे शिवसेनेत असल्याने ते रविंद्र वायकर यांच्या प्रचारात भाग घेताना दिसत आहे. (North West LS Constituency)

या लोकसभा क्षेत्रात महाकाली, जोगेश्वरी आणि अंधेरी गुंफा, आरे वसाहत, चित्रपट महर्षी दादासाहेब फाळक चित्रनगरी अर्थात गोरेगाव फिल्मसिटी, मुंबईचे फुफ्फुस समजले जाणारे आरेचे जंगल, जुहू वर्सेवा चौपाटी, गिल्बर्ट हिल, अंधेरी टेकडी आदींचा परिसर असून या भागांमधील प्रमुख समस्या आहेतच. याशिवाय अनेक इमारतींचा पुनर्विकास, सरकारी जागांवरील झोपड्यांसह इमारतींचा पुनर्विकास, बांधकामांमुळे पसरणारे प्रदुषण, वर्सोवा खाडीतील गाळ काढणे तसेच फेरीवाल्यांसह वाहतूक कोंडी आदी प्रकारच्या प्रमुख समस्या आहेत. (North West LS Constituency)

(हेही वाचा – Mahadev Betting App चे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह ७० जणांना अटक)

या लोकसभा मतदार संघात सुमारे १७ लाख ३५ हजार ०८८ मतदार असून त्यामध्ये ९ लाख ३८ हजार ३६५ पुरुष आणि ७ लाख ९६ हजार ६६३ महिला मतदार आहेत. शिवाय २३६ तृत्तीयपंथी मतदार आहे. या भागातील जनतेच्या म्हणण्यानुसार, मेट्रोची कामे मोठ्याप्रमाणात सुरु असून तसेच इतर बांधकामांमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणात पसरले आहे. तसेच फेरीवाल्यांचीही मोठी समस्या असून या भागातील जनतेला प्रदुषण मुक्त परिसर मिळावा अशी भावना व्यक्त केली जात आहे. तर या भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास करताना उंच इमारती बांधल्या जातात. परंतु त्यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची जागा ठेवली जात नाही. परिणामी वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. शिवाय मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि मनोरंजन मैदानाची कमतरता असून ती उपलब्ध करून दिली जावीत असे लोकांचे म्हणणे आहे. (North West LS Constituency)

या मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी बोलतांना आपण ३५ वर्षांपासून राजकारणात असून महागुंफेसह मराठी भाषेला अभिजात दर्जा, हवाई मार्गामुळे विमानतळाच्या आसपासच्या जागांवर फनेल झोन निर्माण झाल्याने अनेक इमारतींचा विकास होत आहे, तो प्रश्न सोडवणे आपला प्रयत्न आहे, तर उबाठा शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी बोलतांना सांगितले की या मतदार संघातील वन जमिनीचा प्रमुख असून वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या आहे. त्यामुळे सर्व प्राधिकरणांशी समन्वय साधून या वाहतूक कोंडीवर मात करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे सध्याच्या या लोकसभेतील आढावा घेतल्यास दोन वेळा गजानन किर्तीकर हे खासदार असले तरी त्यांचा कारभार हा अमोल किर्तीकर हेच पाहत होते. त्यामुळे किर्तीकर हे परिचित असल्याने वायकर यांच्यामुळे ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यापैकी कुणीही जिंकला तरी शिवसेनेचाच विजय होईल, असे बोलले जात आहे. (North West LS Constituency)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात निवडून आलेले लोकप्रतिनिधी

सन २००९- १४ : गुरुदास कामत, काँग्रेस

सन २०१४-२०१९ : गजानन किर्तीकर, शिवसेना

सन २०१९- २०२४ : गजानन किर्तीकर, शिवसेना 

विधानसभा मतदार संघ

गोरेगाव : विद्या ठाकूर, भाजपा

दिंडोशी : सुनील प्रभू, शिवसेना उबाठा

जोगेश्वरी पूर्व : रविंद्र वायकर, शिवसेना

वर्सोवा : डॉ. भारती लव्हेकर, भाजपा

अंधेरी पश्चिम : अमित साटम, भाजपा

अंधेरी पूर्व : ऋतुजा लटके, शिवसेना उबाठा 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.