Lok Sabha Election 2024: फिर से खेला होबे! ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार

281
Lok Sabha Election 2024: फिर से खेला होबे! ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार
Lok Sabha Election 2024: फिर से खेला होबे! ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार

Jराज्यातील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडत आहे. यानंतर ४ जूनच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. त्यापूर्वी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. कंबोज यांनी ट्विट करुन महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये केलेल्या विधानानंतर मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी हा दावा केला आहे. (Lok Sabha Election 2024)

मोहित कंबोज यांचा दावा काय ?

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘4 जून रोजी लोकसभेचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडले. दोन्ही पक्षांमधून आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत.’ असा दावा कंबोज यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024)

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकच्या सभेत भाजपवर टीका केली होती. माझी मला चिंता नाही. मला तुमच्या आशीवार्दाचं कवच आहे, तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. मोदीजी तुम्ही तुमच्या भाजपची चिंता करा. ज्यावेळी तुम्ही आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी आम्ही एक पंतप्रधान देऊ, असे तुम्ही म्हणता. अहो निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे चेहराच नाही. तुम्ही पंतप्रधान नसाल तर दोन वर्षांमध्ये भाजपची हालत काय होते, ते बघा. 5 तारखेलाचा अर्धा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळे गद्दार जमवले आहेत. सत्ता आल्यावर सगळी यंत्रणा आमच्या हातात असेल, मग आम्ही या गद्दारांच्या शेपट्या कशा पकडतो, बघा तुम्ही. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केली होती. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.