मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील 90 पोलीस हवालदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर 113 पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती दिली आहे. मुंबई पोलिसांसाठी (Mumbai Police) ही आनंदाची बातमी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत ही पदोन्नती करण्यात आल्याने निवडणूक आयोगाला देखील या संदर्भात महिती देण्यात आली आहे. (Mumbai Police)
सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे ला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गृह खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. गृह खात्याने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत 20 मे रोजी मतदान होईल. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पोलिसांची कमतरता पडू नये, यासाठी गृह खात्याने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती आहे. (Mumbai Police)
पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी
बदल्या करण्यात आलेल्यांनी बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस (Mumbai Police) अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही, याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा, असे आदेशात म्हटले आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community