राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (National Education Policy) भारतीय ज्ञान प्रणालीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठातील हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. हिंदू अध्यासन केंद्र आणि टेम्पल कनेक्टने (Temple Connect) याबाबत सामंजस्य करार केला असून सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी, या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत असलेली भारतीय ज्ञान परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना होईल त्याचबरोबर एका नवीन रोजगाराच्या संधीचे दालन खुले होऊ शकेल. (Mumbai University)
तीन महिने मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील विविध मंदिरांमध्ये अनुभवाधारित प्रशिक्षण.
अभ्यासक्रमाच्या प्रतिसादावर याची व्याप्ती वाढवून ‘एमबीए इन टेम्पल मॅनेजमेंट’ असाही अभ्यासक्रम राबविण्याचा मानस आहे. आजमीतीस देशातल्या अनेक मंदिरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून सौर ऊर्जा निर्मिती, दानवस्तूंचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी आणि रांगांचे व्यवस्थापन अशा नाविन्यपूर्ण क्षेत्रातही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. प्रशिक्षित तरूणांना यामुळे रोजगार मिळू शकेल, असं कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले. (Mumbai University)