Anita Goyal Passed Away: जेट एअरवेजचे फाउंडर नरेश गोयल यांच्या पत्नीचं निधन!

167
Anita Goyal Passed Away: जेट एअरवेजचे फाउंडर नरेश गोयल यांच्या पत्नीचं निधन!
Anita Goyal Passed Away: जेट एअरवेजचे फाउंडर नरेश गोयल यांच्या पत्नीचं निधन!

जेट एयरवेज (Jet Airways) चे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल (Anita Goyal Passes Away) यांचं कर्करोगांमुळे निधन झालं आहे. दीर्घकाळापासून त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. गुरुवारी (१६ मे) पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Anita Goyal Passes Away)

(हेही वाचा –Mumbai University: मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाला सुरुवात; पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरू)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या नरेश गोयल यांना नुकताच पत्नीला भेटण्यासाठी सशर्त जामीन देण्यात आला होता. आपली पत्नी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं ग्रस्त असून आपल्याला तिच्यासोबत राहायच आहे, अशी विनंती त्यांनी न्यायालयासमोर केली होती. नरेश गोयल स्वतःही कॅन्सरने ग्रस्त आहेत. (Anita Goyal Passes Away)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: फिर से खेला होबे! ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार)

नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचं सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. गोयल कुटुंबात अनिता गोयल यांच्या पश्चात त्यांचे पती आणि दोन मुलं नम्रता आणि निवान गोयल आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला नरेश गोयल यांनी आपल्या पत्नीसोबत राहण्यासाठी वैद्यकीय आणि मानवतावादी आधारावर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अंतरिम जामीन (Interim Bail) मागितला होता आणि त्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला होता. (Anita Goyal Passes Away)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.