Ghatkopar Hoarding Accident : जाहिरात फलकाचा राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण!

घटनास्थळी अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची तपासणी करण्यात आली असून या पाहणीअंती बचावकार्य पूर्ण झाले आहे.

205
Ghatkopar Hoarding Accident : माजी पोलीस आयुक्तांचा निकटवर्तीय अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

घाटकोपरमधील छेडा नगरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सुरू असणारे बचावकार्य आता पूर्ण झाले आहे, तर फलकाचे सुटे भाग व राडारोडा हटवण्याचे कार्यही पूर्णत्वाकडे आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत मृतांच्या नातेवाईकांकडे लवकर पोहचवण्यात येईल, असेही आयुक्त गगराणी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवारी १६ मे २०२४ सकाळी भेट दिली. तसेच घटनास्थळावरील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. उपआयुक्त (परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (विशेष) (अतिरिक्त कार्यभार) किरण दिघावकर व संबंधित अधिकारी या पाहणीप्रसंगी उपस्थित होते. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – School Nutrition: शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये सापडल्या अळ्या!)

या पाहणीप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयुक्त गगराणी म्हणाले की, घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनास्थळी बचाव कार्यासाठी मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, महानगर गॅस लिमिटेड यांच्यासह विविध शासकीय व बाह्य यंत्रणांचा समावेश होता. सर्व यंत्रणांनी आपसात योग्य समन्वय राखून बचावकार्य पूर्ण केले. (Ghatkopar Hoarding Accident)

घटनास्थळी अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची तपासणी करण्यात आली असून या पाहणीअंती बचावकार्य पूर्ण झाले आहे. जाहिरात फलक कापून केलेले सुटे भाग तसेच इतर राडारोडा (डेब्रीज) इत्यादी हटवण्याचे काम निरंतर सुरू आहे. हे काम देखील आता पूर्णत्वाकडे असून गुरुवारी दिवसभर सुरु राहणार आहे. सर्व आवश्यक कार्यवाही करुन घटनास्थळ पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.