सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अशावेळी भाषेचा स्तर घसरत चालला आहे. त्यामुळे अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) याची गंभीर दखल घेतली आहे. भाषणाच्या वेळी नेत्यांनी संयत भाषा वापरावी, अशी सूचना केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांमध्ये स्टार प्रचारक, विशेषत: राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी चांगले उदाहरण मांडावे. समाजाच्या नाजूक आराखड्याला हानी पोहोचवू नये. उर्वरित टप्प्यांमध्ये भाषणे संयत ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने नेत्यांची आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
(हेही वाचा Mumbai University: मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाला सुरुवात; पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू)
शिष्टमंडळ 4000 सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवरून भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आयोगाने (Election Commission) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगावर नागरी समाजाचा दबाव वाढत आहे. चार टप्प्यातील निवडणुकीनंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत शंका-कुशंका असताना सुजाण नागरिकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आयोगाची भेट घेतली. हे शिष्टमंडळ 4000 सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन घेऊन आयोगाकडे (Election Commission) पोहोचले. त्यांची मागणी होती की, फॉर्म 17 सी च्या भाग एकनुसार मतदानाचा डेटा सार्वजनिक केला जावा. देशातील 12 शहरांमधून मोठी मोहीम सुरू झाली असताना शिष्टमंडळाने आयोगाशी संपर्क साधला. या मोहिमेला ग्रो युवर स्पाइन ईसीआय (स्ट्रेंथन युवर स्पाइन इलेक्शन कमिशन) हे नाव दिले आहे. येथून शेकडो पोस्टकार्ड आयोगाकडे पाठवली जात आहेत.
Join Our WhatsApp Community