Prithviraj Chavan यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगावी; NCP ची परखड टीका

201
Prithviraj Chavan यांना निवडणूक जड जाणार ? सांगली पॅटर्न साताऱ्यातही राबवणार !

राज्यात महायुतीला १५-१६ जागा तर मविआला ३०-३५ जागा मिळतील अशी भविष्यवाणी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच काही वर्तमानपत्रात केली आहे. परंतु ते फक्त राज्याचे मुख्यमंत्री होते आणि माजी मुख्यमंत्री म्हणून टीव्हीवर त्यांना काही प्रमाणात टीआरपी मिळतो. पण त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करावे एवढी उंचीही त्यांची नाही. त्यामुळे त्यांनी आता पोपट घेऊन भविष्यवाणी करावी, अशा परखड शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी गुरूवारी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. (Prithviraj Chavan)

जे कराड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्यांना स्वतःची ग्रामपंचायत देखील राखता आलेली नाही हे केवढे मोठे दुर्दैव आहे अशा शब्दात पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागली. मात्र जे भाकीत चव्हाण यांनी केले तशीच शरद पवार आणि रोहित पवार यांनीही भविष्यवाणी केली आहे. आता राज्यात निवडणूकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे अशी भविष्यवाणी करुन पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु शरद पवार यांच्याकडे राज्याच्या राजकारणाचा दिर्घ अनुभव असल्याने त्यांच्याबाबत मात्र आपण काही बोलणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले. (Prithviraj Chavan)

कराड दक्षिणची जागा स्थानिक काँग्रेसचे दिग्गज नेते विलासकाका पाटील-उंडाळकर हे बरीच वर्षे कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून येत होते. मात्र त्याच जागेवर डोळा ठेवून पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना षडयंत्र करून विलासकाका पाटील यांना एका खून खटल्यात सहआरोपी केलेच पण त्यांना व त्यांच्या कुटुंबियांनाही अडचणीत आणण्याचे पाप केले, अशी पोलखोल करत ते सध्या जो काही साळसूदपणाचा आव आणतात त्यावरून त्यांनी राज्याची भविष्यवाणी करु नये असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला. (Prithviraj Chavan)

(हेही वाचा – धारावीतील रॅपर्सकडून Rahul Shewale यांना अनोखी भेट; राहुल शेवाळे जैसा है कौन? गाण्याने घातला धुमाकूळ)

पंतप्रधानांच्या सभेत अजित पवारांची उपस्थिती?

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत अशाच बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील असा विश्वासही पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. काँग्रेसने आरोप जे केले आहेत ते योग्य नाहीत. अजित पवार यांचासारखा मासलिडर ज्यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत. मतदारांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतःचे नुकसान करुन घेईल, अशी विचारणाही पाटील यांनी केली. (Prithviraj Chavan)

अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार की नाही हे मतदारच ठरवतील. ४ जूनला त्याचे निष्कर्षही येतील. अहो अजित पवार यांच्या पाठीशी ४०-५० आमदार आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण तुमच्यासोबत किती आमदार आहेत असा संतप्त सवाल करतानाच कॉंग्रेसचा एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य माध्यमांनी किती गांभीर्याने घ्यावे याचा देखील विचार त्यांनी करावा, असा खोचक सल्लाही पाटील यांनी दिला. (Prithviraj Chavan)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर जात असताना चार चार बॅगा घेऊन जातात त्यांची कोणतीही तपासणी निवडणुक आयोगाचे पथक किंवा पोलिस करत नाहीत. मुख्यमंत्री शिंदे या बॅगांमधून नोटा वाटप करत फिरत आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी यांनी काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. त्यासंदर्भात विचारणा केली असता पाटील म्हणाले की, अहो आता माझी गाडी तपासली तरी माझ्या गाडीत ३-४ बॅगा सापडतील. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता राज्यात प्रचारासाठी फिरत असताना एवढे साहित्य ठेवतो. तर राज्याचे मुख्यमंत्री दौरा करणार त्यावेळी त्यांचे सामान सोबत असणारच आहे. शिवाय कर्मचारीही सोबत असतात त्यांचेही सामान असणार आहे. त्यात एवढे गहजब करण्याची काय आवश्यकता असा थेट व परखड सवालही पाटील यांनी विरोधकांना केला. (Prithviraj Chavan)

लोकसभा निवडणुकी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे देशभर सुरु आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन काटेकोरपणे केलेले असते .त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी अशी परवानगी दिली गेली नाही. कारण यापूर्वी या देशाचे दोन पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तवच आपण गमावलेले आहेत. म्हणून सुरक्षा यंत्रणा काळजी घेत असते आणि त्यामुळेच प्रचाराचा कार्यक्रम सोडून तिथे भेट देणे शक्य झाले नाही असे सांगतानाच बेकायदेशीर होर्डिंगसंदर्भात कायदा बनवावा अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस करेल असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. (Prithviraj Chavan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.