PM Narendra Modi : ४ जूननंतर इंडि आघाडी फूटणार; पंतप्रधानांचा हल्लाबोल

174
Lok Sabha Election 2024: मम्मीचा मतदारसंघ असल्याचे सांगत..., राहुल गांधींच्या 'या' निर्णयावर मोदींनी केला हल्लाबोल
Lok Sabha Election 2024: मम्मीचा मतदारसंघ असल्याचे सांगत..., राहुल गांधींच्या 'या' निर्णयावर मोदींनी केला हल्लाबोल

राजवाड्यांमध्ये वाढलेल्या शहजाद्यांना असे वाटते की, विकास आपोआप होईल. कोणी कसे विचारले तर ते म्हणतील खटाखट. त्यांना कोणीतरी सांगा की, रायबरेलीची जनतासुद्धा त्यांना खटाखट पाठवेल. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या लोकांच्या हातून देश चालत नाही. ४ जूननंतर इंडि आघाडीत (India Alliance) फूटणार खटाखट… शहजादे परदेशात जातील खटाखट… आम्ही आणि तुम्ही फक्त राहणार, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे.

(हेही वाचा – घाटकोपरनंतर Pimpri-Chinchwad शहरात होर्डिंग कोसळले; मात्र मोठी दुर्घटना टळली)

लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha elections 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतापगढमधील प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांची इंडिया आघाडी फुटणार आहे आणि ती फुटल्यानंतर शहजादे परदेशात पळून जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्रतापगढमध्ये भाजपाचे उमेदवार संगम लाल गुप्ता यांच्या निवडणूक रॅलीत नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करत होते.

ते पाच वर्षांत पाच पीएम बनवतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या लोकांना सरकार हटवायचे आहे. त्यांचा फॉर्म्युला असा आहे की, ते पाच वर्षांत पाच पीएम बनवतील म्हणजेच दरवर्षी एक पीएम. त्यांना भानुमतीचा कुनबा बनून लुटायचे आहे. ते देश बरबाद करतील कि नाही? एकदा व्यावसायिकाला कर्मचाऱ्याची गरज होती. २४ वर्षांच्या तरुणाची गरज होती. एका व्यक्तीने १२-१२ वर्षांचे २ तरुण आणले. त्यांना कामासाठी ठेवले जाईल का? अशीच अवस्था इंडिया आघाडीच्या लोकांची झाली आहे. इंडिया आघाडीच्या लोकांनी २०१४ पर्यंत देशाचा नाश केला. आम्हाला सत्ता मिळाल्यावर त्यांनी केलेले खड्डे बुजवायला खूप वेळ लागला. स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर होती. त्यांनी ११ व्या क्रमांकावर नेऊन ठेवली. मोदींनी ती पाचव्या स्थानावर आणली. तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यास भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल, ही मोदींची गॅरंटी आहे. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.