Covaxin Vaccine: कोविशिल्डनंतर आता ‘कोवॅक्सिन’ लसीचीही चाचणी, संशोधकांनी सांगितलेले दुष्परिणाम कोणते?

198
Covaxin Vaccine: कोविशिल्डनंतर आता 'कोवॅक्सिन' लसीचीही चाचणी, संशोधकांनी सांगितलेले दुष्परिणाम कोणते?

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डनंतर संपूर्ण स्वदेशी असलेल्या कोवॅक्सिन लसीमुळेही दुष्परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे. बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) या लसीबाबत चाचण्या घेण्यात आल्‍या. चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या साधारण एक तृतीयांश लोकांमध्ये या लसीचे दुष्परिणाम दिसले आहेत. (Covaxin Vaccine)

भारत बायोटेक या कंपनीने कोरोना काळात संशोधन करून या लसीचे उत्पादन केले होते. लशीच्या परिणामांच्या तपासणीसाठी चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील एक तृतीयांश लोकांमध्ये ‘ॲडव्हर्स इव्हेंट ऑफ स्पेशल इंटरेस्ट’ (एईएसआय- विशेष स्वारस्य असलेल्या प्रतिकूल घटना) दिसून आले आहेत. या चाचण्यांमधील निरीक्षणांची माहिती ‘स्पिंगरलिंक’ या ‘स्प्रिंगर’ने प्रकाशित केलेल्या नियतकालिक आणि इतर साहित्यांसाठी संयुक्त व्यासपीठावर प्रसिद्ध केली आहे. (Covaxin Vaccine)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: पाकव्याप्त काश्मीर भारताचेच आहे, आम्ही ते घेऊ; अमित शहा यांनी कॉंग्रस नेत्यांवर साधला निशाणा)

महिला किशोरवयीन आणि ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांना कोवॅक्सिनची लस घेतल्यानंतर ‘एईएसआय’चा जास्त धोका असतो, असे अहवालात म्हटले आहे. एक वर्षे सतत निरीक्षणांतर हे दुष्परिणाम कायम होते, असे हे संशोधन करणारे ‘बीएचयू’मधील संख शुभ्र चक्रवर्ती आणि त्यांच्या पथकाने सांगितले. यात नाव नोंदविलेल्या एक हजार २४ लोकांपैकी ६३५ किशोरवयीन आणि २९१ प्रौढांचे एक वर्षे सतत निरीक्षण केले.

अभ्यासानुसार, ३०४ (४७ .९ टक्के) किशोरवयीन आणि १२४ (४२.६ टक्के) प्रौढांमध्ये श्‍वसनासंबंधीचा संसर्ग (व्हायरल अप्पर रेस्पेरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) आढळून आला. अशा लोकांमध्ये सर्दी, खोकला अशा समस्या आढळल्या. डोळे आणि थायरॉईडसंबंधी अनुक्रमे २.७ टक्के आणि ०.६ टक्के आढळून आले.

चाचण्यांमधील अन्य निरीक्षणे

  • सहभागींपैकी एक टक्का ‘एईएसआय’तील स्ट्रोक (०.३ टक्के) स्ट्रोक आणि स्नायूंमधील कमकुवतपणाची (०.१ टक्के) लक्षणे
  • किशोरवयीन, महिला आणि ॲलर्जी आणि लसीकरणानंतर टायफॉइड झालेल्यांना ‘एईएसआय’चा धोका अनुक्रमे १.६, २.८ आणि २.८ पटीने जास्त होता
  • कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर विकसित होणाऱ्या एईएसआयची लक्षणे वेगवेगळ्या वयोगटात वेगळी होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.