Central Railwayवर १५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, सीएसएमटीहून शेवटची लोकल किती वाजता सुटेल? पहा वेळापत्रक

ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.

230
Local Trainची वाहतूक पूर्ववत, मध्य रेल्वेचे अप-डाऊन मार्ग सुरू, रेल्वे वाहतूकीचे अपडेट जाणून घ्या...
Local Trainची वाहतूक पूर्ववत, मध्य रेल्वेचे अप-डाऊन मार्ग सुरू, रेल्वे वाहतूकीचे अपडेट जाणून घ्या...

२४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ची लांबी वाढवण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. यासाठी अभियांत्रिकी-विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंग कामे करण्यासाठी शुक्रवार १७ मे ते शनिवार, १ जूनपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

ब्लॉकवेळेत काही मेल-एक्स्प्रेस पनवेल, दादर स्थानकांपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिरा मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांची पुढील १५ दिवस गैरसोय होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी शुक्रवार ते सोमवारदरम्यान बाधित होणारी रेल्वेगाड्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Mumbai Traffic Police: मुंबईत नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा, गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते? वाहतूक पोलिसांकडून सूचना जारी )

स्थानक सीएसएमटी ते भायखळा
मार्ग – अप धीमा, अप-डाउन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १० -१८ दरम्यान सर्व मार्गिका
वेळ – रात्री ११ ते पहाटे ५ (रोज रात्री ६ तास)

मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील परिणाम
– सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ कसारा ही शेवटची लोकल
– कल्याणहून रात्री १०.३४ सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल
– सीएसएमटीहून पहाटे ४.४७ कर्जत ही पहिली लोकल
– ठाण्याहून पहाटे ४ सीएसएमटी ही पहिली लोकल
– ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.

दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस
– २२२२४ साईनगर शिर्डी – सीएसएमटी वंदे भारत
– १२५३३ लखनऊ-सीएसएमटी पुष्पक
– ११०५८ अमृतसर-सीएसएमटी
– ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क
– १२८१० हावडा-सीएसएमटी मेल
– १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी
– २२१२० तेजस-सीएसएमटी तेजस
– १२१३४ मंगलोर-सीएसएमटी
– १२७०२ हैद्रराबाद-सीएसएमटी हुसैन सागर
– १२८१० हावडा-सीएसएमटी

दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या
– २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत
– २२१५७ सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट
– ११०५७ सीएसएमटी-अमृतसर
– २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी
– १२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी

पनवेलपर्यंत चालविण्यात येणारी एक्स्प्रेस
-१०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी

पनवेलहून सुटणारी एक्स्प्रेस
– २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.