चारधाम यात्रेनिमित्त केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे होणाऱ्या भाविकांच्या गर्दीला आवर घालणं हे भाविकांसाठी नेहमीच आव्हान असतं. त्यामुळे दिवसेंदिवस यात्रेनिमित्त वाढती गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडचे मुख्य सचिव राधा रतुरी यांनी VIP दर्शनावरील बंदी ३१मेपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही बंदी २५मेपर्यंत लागू करण्यात आली होती. (Chardham Yatra)
प्रशासनाने मोबाईल फोन घेऊन जाण्याबाबत नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. मंदिराच्या ५० मीटर परिसरात भाविकांना रील्स आणि व्हिडिओ बनवता येणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. उत्तराखंड सरकारने गेल्या २ महिन्यांत ५ बैठका घेतल्या. यमुनोत्री आणि गंगोत्री मार्गावरील वाहतूक कोंडीवर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, मात्र २ दिवसांपूर्वी २० ते २५ तास लागणाऱ्या वाहतुकीचा वेळ आता कमी झाल्याने यात्रेकरूंना दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा – Navi Mumbai: बनावट नोटांच्या छापखान्यावर धाड घालून तरुणावर गुन्हा दाखल, २ लाखांच्या नोटा जप्त )
प्रथमच ४००पेक्षा जास्त डॉक्टरांचे पथक तैनात
चारधाम यात्रेच्या मार्गावर प्रथमच ४००पेक्षा जास्त डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये २५६ आपत्कालिन वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. तरीही भाविकांनी प्रवासादरम्यान किमान ७ दिवसांचे नियोजन करावे. यामुळे वाढत्या आणि घटत्या तापमानाला शरीर अनुकूल राहिल तसेच चारही धामांचे अंतर ३ हजार मीटरपेक्षा जास्त आहे. येथील पर्वतांवर अधूनमधून बर्फवृष्टी होत असते. त्यामुळे भाविकांनी १५ दिवसांच्या यात्रेचे नियोजन करावे, अशी माहिती उत्तराखंड आरोग्य विभागाने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community