Rajnath Singh: पाकिस्तानने भारताचे सामर्थ्य स्वीकारले आहे – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

165
Rajnath Singh: पाकिस्तानने भारताचे सामर्थ्य स्वीकारले आहे - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

‘भारत ही जगात एक उदयोन्मुख शक्ती आहे”, अशा शब्दात पाकिस्तानच्या संसदेतील मुत्ताहिद कौमी मूव्हमेंटचे (एमक्यूएम) खासदार मुस्तफा कमाल या नेत्याने भारताचे कौतुक केले. यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘भारतासाठी कधीही चांगले न बोलणारा शेजारी देश आता भारताचा शक्तिशाली देश म्हणून स्वीकार केला आहे, असे म्हटले आहे.’ (Rajnath Singh)

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आता शेजारी देशही भारताच्या सामर्थ्याची प्रशंसा करत आहेत. पाकिस्तानने कधीही भारताची स्तुती केलेली नाही, परंतु त्यांचे नेते भारताची स्तुती करत आहेत. पाकिस्तानने भारताचे सामर्थ्य स्वीकारले आहे.  (Rajnath Singh)

लोकसभा निवडणुकीसाठी लखनौ येथे जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इस्लामिक राष्ट्रदेखील भारताच्या विकासाला ‘शक्तिशाली राष्ट्र’ म्हणून मान्यता देत आहेत. पाकिस्तान अजून मागासलेला आहे. भारताविषयीची धारणा जगभरात बदलली आहे. २१ वे शतक भारताचे आहे, असे आता सर्व देशांचे नेते म्हणत आहेत. २०२७पर्यंत संपत्तीच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर असेल.

(हेही वाचा – Sunil Chhetri to Retire : भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री जूनमध्ये होणार निवृत्त)

आपल्या शेजारी देशांपैकी एक देश आमच्यासाठी कधीही चांगले बोलला नाही. जगभरात भारताची प्रतिमा बदलली आहे. भारत मजबूत होत आहे. भारताविषयी धारणा जगभरात बदलली आहे, असे जागतिक नेते म्हणत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासह लखनौ लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. सिंह हे लखनौचे लोकसभेचे खासदार आहेत. यावेळी ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा १ जून रोजी होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लखनौ लोकसभा मतदारसंघात भाजपचे राजनाथ सिंह, समाजवादी पक्षाचे रविदास मेहरोत्रा आणि बहुजन समाज पक्षाचे सरवर मलिक यांच्यात लढत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी ४०० हून अधिक जागा जिंकेल. “निवडणुका सुरू आहेत आणि ४ टप्पे पूर्ण झाले आहेत. या ४ टप्प्यांनंतर एन. डी. ए. ४००हून अधिक जागा जिंकत असल्याचे मतही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.