आपल्या आयुष्यातल्या खास व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना काव्यमय शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला तर त्यांना कित्ती बरं वाटेल ना.. आणि ती स्पेशल व्यक्ती तुमची बायको असेल तर? सामान्यतः नवरे आपल्या बायकांचा वाढदिवस लक्षात ठेवत नाहीत किंवा विसरतात असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे बायकांना वाटतं की आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेमच नाहीय. पण तसं नाहीय. कामाच्या आणि इतर बाहेरच्या गोष्टींच्या व्यापामुळे नवरे आपलं बायकोवर असलेलं प्रेम व्यक्त करायला विसरतात. (Birthday Wishes For Wife In Marathi)
पण आता तसं होणार नाही, कारण आम्ही खास तुमच्यासाठी आपल्या जोडीदाराच्या वाढदिवसाला देता येतील अशा काव्यमय शुभेच्छांचा खजिना घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करायला शब्द सापडत नसतील तर अजिबात काळजी करू नका. कारण आम्ही तुमच्यासाठी असे काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, की ते वाचून तुमची बायको नक्कीच पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.. (Birthday Wishes For Wife In Marathi)
(हेही वाचा – Rajnath Singh: पाकिस्तानने भारताचे सामर्थ्य स्वीकारले आहे – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह)
१.
शिंपल्यांचे शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात… मोत्याहून सुंदर अशा माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
२.
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारांमध्ये माझी साथ दिली,
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!! (Birthday Wishes For Wife In Marathi)
३.
माझा चेहरा पाहून माझ्या मनातलं गुपित
ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
४.
माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर
बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा..
५.
श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू सोबत नसलीस तर माझं जीवन व्यर्थ आहे!!
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा..!! (Birthday Wishes For Wife In Marathi)
६.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात…
प्रलयाच्या कठोर वाटेवरही देईन मी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये…
७.
कधी रुसलीस कधी हसलीस..
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस..
मनातले दुःख कधी समजू नाही दिलंस,
आयुष्यात तू मला फक्त सुख दिलंस…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! (Birthday Wishes For Wife In Marathi)
८.
जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार होवो..
आजचा दिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण होऊन येवो..
त्या आठवणीने आपलं आयुष्य स्वर्गासारखं सुंदर राहो..
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
९.
चेहऱ्यावरचा आनंद
कधीच जायला नको..
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको..
आनंदाचा झरा सदैव
आयुष्यात वाहत राहो..
हीच आहे माझी ईच्छा,
माझ्या लाडक्या बायकोला
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!! (Birthday Wishes For Wife In Marathi)
१०.
माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
११.
जगाला सुख पाहिजे
पण मला मात्र
माझ्या प्रत्येक सुखात
फक्त तू पाहिजे..
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
१२.
नवे क्षितीज, नवी पहाट..
फुलावी आयुष्यात, स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुझे, सदैव असेच राहो..
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो..
बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!! (Birthday Wishes For Wife In Marathi)
१३.
माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी आहे खूप नशिबवान
कारण माझी सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
१४.
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले,
इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्याचसाठी आणले सारे..
लाडक्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा! (Birthday Wishes For Wife In Marathi)
१५.
वेळ कशीही असली तरी
मला त्याची काळजी नसते,
कारण माझ्या चेहऱ्यावर
आनंद आणण्यासाठी
तुझे हसणेच पुरेसे असते..
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community