Indian Armyने लडाखमध्ये १४,५०० फूट उंचीवर स्थापन केली टँक दुरुस्ती केंद्रे, काय आहेत वैशिष्ट्ये?

भारताने पूर्व लडाखमध्ये ५०० हून अधिक रणगाडे आणि पायदळ लढाऊ वाहनेही तैनात केली आहेत.

209
Indian Armyने लडाखमध्ये १४,५०० फूट उंचीवर स्थापन केली टँक दुरुस्ती केंद्रे, काय आहेत वैशिष्ट्ये?

चीनच्या वाढत्या लष्करी तैनातीमुळे भारताने देशाच्या सीमेजवळील संरक्षणदेखील वाढवले आहे. दोन दिवसांपूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री (EAM)एस जयशंकर यांनी चीनच्या सीमेवर सैन्य तैनात केले असल्याची माहिती दिली. भारतीय नागरिक म्हणून आपल्यापैकी कोणीही देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये, हे आज एक आव्हान आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे. भारताच्या हद्दीतील भागांवर ताबा मिळवण्याचा चीनचा हेतू साध्य होऊन यासाठी भारतीय लष्कराने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. (Indian Army)

भारतीय बनावटीची चिलखतं
भारताने जगातील २ सर्वोच्च टँक दुरुस्ती केंद्रे स्थापन केली आहेत. भारताने पूर्व लडाखमध्ये ५०० हून अधिक रणगाडे आणि पायदळ लढाऊ वाहनेही तैनात केली आहेत. भारतीय लष्कराने चीन सीमेजवळील न्योमा आणि डीबीओ सेक्टरमध्ये १४,५०० फूट उंचीवर दोन चिलखती वाहनं देखभाल आणि दुरुस्ती सुविधा उभारल्या आहेत. एप्रिल-मे २०२० मध्ये भारत आणि चीनमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय बनावटीची चिलखतं वाहने जसे की, टँक आणि BMPलढाऊ वाहने तसेच क्विक रिॲक्शन फायटिंग वाहने तैनात करण्यात आली आहेत. (Indian Army)

(हेही वाचा – Wrestling Olympic News : ऑलिम्पिकसाठी संघ निवडीचे निकष कुस्ती फेडरेशन २१ मे ला जाहीर करणार)

भारताने देशाच्या सीमेजवळील संरक्षण वाढवले
भारतीय लष्कराने वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) लडाखमध्ये जगातील दोन सर्वोच्च टँक दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या आहेत. यापैकी एक केंद्र उत्तरेला आहे, दौलत बेग ओल्डी (DBO) सेक्टरमध्ये एक टँक दुरुस्तीची सुविधा निर्माण केली आहे आणि दुसरी सुविधा १४,५०० फूट उंचीवर न्योमामध्ये निर्माण करण्यात आली आहे. २०२० च्या गलवान व्हॅलीमध्ये चीनशी झालेल्या संघर्षानंतर भारताने अनेक टँक, BMP लढाऊ वाहने आणि भारतीय बनावटीची क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेईकल्स तैनात केल्यामुळे या चिलखती वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती सुविधा अत्यंत आवश्यक होती. ”टँक आणि पायदळ लढाऊ वाहने या अति उंचीच्या भागात तैनात करण्यात आली आहेत, जिथे त्यांना देखभाल आणि दुरुस्तीसाठी परत खाली आणणे देखील कठीण आहे,” असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. ”या प्रदेशात चिलखती वाहन चालवण्यास मदत करण्यासाठी आम्ही DBO क्षेत्रातील DS-DBO रोडवर न्योमा येथे आणि KM-148 जवळ या मध्यम देखभाल दुरुस्ती सुविधा उभारल्या आहेत. ही दोन मुख्य क्षेत्रे आहेत, जिथे पूर्व लडाख सेक्टरमध्ये टँक आणि ICV ऑपरेशन्स केंद्रित आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.

लढाऊ वाहनांची कार्यक्षमता आणि सेवाक्षमता वाढवण्यास मदत
भारताने पूर्व लडाखमध्ये ५०० हून अधिक रणगाडे आणि पायदळ लढाऊ वाहने तैनात केली आहेत. त्यांना दुरुस्ती आणि देखभालीसाठी मुख्य भूमीवर आणणे हे एक कठीण काम होते. ही नवीन दुरुस्ती केंद्रे भारतीय सैन्याला लढाऊ वाहनांची कार्यक्षमता आणि सेवाक्षमता वाढवण्यास मदत करतील, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अद्वितीय देखभाल सुविधा
११ मे रोजी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लडाखमधील केंद्रांना भेट दिली. एका अधिकृत ट्विटमध्ये लष्कराने म्हटले आहे की, ‘अद्वितीय देखभाल सुविधा’ आर्मर्ड फायटिंग व्हेईकल्सच्या सेवाक्षमतेला आणि मिशनच्या विश्वासार्हतेला प्रोत्साहन देते, खडबडीत प्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात उणे ४० अंशांपर्यंत खाली उतरूनही कार्य करते. ज्या भागात दुरुस्ती केंद्रे उभारण्यात आली आहेत, तेही महत्त्वाचे आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.