‘फेडेक्स’ कुरिअरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक (Online Froud) झालेली ८ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम सायबर गुन्हेगाराच्या हाती न लागू देता ‘गोल्डन अवर्स’मध्ये रोखण्यात ओशिवरा पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणी टोळीतील एकाला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या बँक खात्यावर फसवणुकीची रक्कम जमा झाली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राजस्थानच्या सुरतगड येथे ही टोळी कार्यरत असून टोळीच्या अटकेसाठी ओशिवरा पोलिसाचे एक पथक राजस्थान येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Online Froud)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओशिवरा येथे राहणारे तक्रारदाराला महिन्याभरापूर्वी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता, कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो फेडेक्स कुरिअर सर्विसच्या ग्राहक सेवा विभागातून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाचे मुंबई विमानतळावर एक पार्सल आले आहे, त्या पार्सलमध्ये अमली पदार्थ मिळाले असून हे अमली पदार्थ तस्करीचे प्रकरण आहे, तुम्हाला सायबर पोलिस अधिकारी कॉल करतील असे सांगून कॉल बंद करण्यात आला. (Online Froud)
(हेही वाचा – Lok Sabha Election : दक्षिण मध्य मुंबईत जो लावेल जास्त जोर, त्याचाच होईल शोर)
काही वेळाने दुसऱ्या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला, कॉल करणाऱ्याने सायबर पोलीस अधिकारी एअरपोर्ट मुंबई येथून बोलत असल्याचे सांगून तक्रारदाराला तुमच्या नावाने अमली पदार्थ असणारे पार्सल तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे, या संदर्भात तुमच्या बँक खात्याची तपासणी करावयाची आहे, असे सांगून काही वेळ करता त्यांच्या बँक खात्यातील ८ लाख ४३ लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या बँक खात्यात वळविण्यास तक्रारदाराला भाग पाडले, या प्रकारे तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच तक्रारदाराने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Online Froud)
ओशिवरा पोलीस ठाण्याचे सायबर सेलचे अधिकारी सपोनि. शरद देवरे यांनी तात्काळ पीएनबी बँकेचे नोडल अधिकाऱ्यांना संपर्क साधून बँकेला ई-मेल पाठवून तक्रारदाराच्या खात्यातुन दुसऱ्या खात्यात पाठविण्यात आलेली रक्कम गोठविण्यात आली. दरम्यान, ओशिवरा पोलीस पथकाने बँक खात्याची माहिती घेऊन पोलीस पथक राजस्थान येथील सुरतगड येथे रवाना झाले, स्थानिक पोलिसांच्या मदतीने रामपूर नेवला, येथून शिशपाल पृथ्वीराज शर्मा (४६) याला अटक करण्यात आली. पृथ्वीराज शर्मा याचे बँक खाते वापरण्यात आले होते, व त्याला फसवणुकीच्या रकमेवर १० टक्के कमिशन मिळत होते. या टोळीच्या मागावर एक पथक राजस्थान येथे पाठविण्यात आले आहे. (Online Froud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community