North East Mumbai LS Constituency : पडळकर यांचा कोटेचा यांच्यासाठी ईशान्य मुंबईत प्रचार

129
North East Mumbai LS Constituency : पडळकर यांचा कोटेचा यांच्यासाठी ईशान्य मुंबईत प्रचार

सध्याची लोकसभा निवडणूक ही देशाचे भवितव्य आणि नेता ठरवणारी असून आपले प्रत्येक मत विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे हात बळकट करण्यासाठी द्या, असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. (North East Mumbai LS Constituency)

पडळकर यांनी मानखुर्दमधील श्री. मायाक्का देवीच्या मंदिरात मुलुंडचे आमदार आणि भाजपा महायुतीचे मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासोबत जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर नागरिकांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पडळकर म्हणाले की, समाजाच्या लोककल्याणासाठी मोदीजींना आणि त्यांचा सैनिक म्हणून कोटेचा यांना बळ देण्याची गरज आहे. विकसित भारताचे मोदीजींचे स्वप्न साकारण्यासाठी यावेळी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहनही पडळकर यांनी केले. (North East Mumbai LS Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : हरियाणातील १० जागा जिंकण्यासाठी भाजपा मैदानात)

तसेच, घाटकोपर पश्चिम मधील सर्व भाषिक बहुजन संमेलनात ते सहभागी झाले. माझ्या बहुजन बंधू भगिनींना संबोधित करत मोदी सरकारतर्फे बहुजन समाजाला मिळालेली हमी अधोरेखित केली. “जो बहुजन हित की बात करेगा, वहीं देश पे राज करेगा” हा नारा भाजपाने वास्तवात उतरवला. सामाजिक न्यायासाठी यशस्वी धोरणं राबवली. परिस्थिती सकारात्मकरित्या बदलली. यंदाच्या लोकसभेत मतदानाच्या रुपात बहुजन समाज भाजपाचे आभार मानणार आहे, असेही प्रतिपादन पडळकर यांनी यावेळी केले. (North East Mumbai LS Constituency)

या कार्यक्रमाआधी पडळकर, स्वरसम्राट साजन बेंद्रे आणि कोटेचा यांनी चिराग नगर, घाटकोपर पश्चिम येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून त्यांना अभिवादन केले. (North East Mumbai LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.