राज्यात उन्हाचा पारा चढत चालला आहे. अशातच उन्हाचा पारा वाढत असल्याने भूजलाची पातळी खाली जात आहे. यामुळे लातूरकरांना जिल्ह्यात (Latur District) पाणी टंचाईची तीव्रता सहन करावी लागत आहे. लातूर जिल्ह्यात सध्या टंचाईग्रस्त गावांची संख्या चारशेपार झाली आहे. अधिग्रहणासाठी ६६७ प्रस्ताव दाखल आहेत. त्यापैकी २९० गावांना ३५९ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढेही पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासून पाणीटंचाईची (Latur Water shortage) समस्या जाणवू लागली आहे.
(हेही वाचा – Online Froud : फेडेक्स कुरिअरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, राजस्थानमधून एकाला अटक)
लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई सुरू आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात १५ दिवसांतून एकदाच पाणी येतं. तसेच जिल्ह्यातल्या ३७ गावे आणि २० वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा (Tankar Water Supplay) सुरू आहे. तर ५७ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. लातूर जिल्ह्यात पाण्याचे आठ मध्यम प्रकल्प आहेत. या आठ प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी प्रश्नाने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. टँकर जेव्हा वाड्या आणि वस्त्यांमध्ये येतो तेव्हा लोक हंडा घेऊन टँकरकडे पळत जातात. पाणी प्रश्नामुळे गावकऱ्यांचे जीवन हालाखीचे झाले आहे.
(हेही वाचा – समाजवादी पक्ष आणि काँग्रेस सत्तेत आले तर रामलला पुन्हा तंबूत जातील; PM Narendra Modi यांची चेतावणी)
अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई…
लातूर – ४८
औसा – ४६
निलंगा – ६८
रेणापूर – ४८
अहमदपूर – ९९
चाकूर – ३३
शिरुर अनं. – १२
उदगीर – ४०
देवणी – २०
जळकोट – २०
एकूण – ४३४
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community