Raj Thackeray यांनी मांडली PM Narendra Modi यांच्यासमोर मुंबई महाराष्ट्राच्या विकासाची पंचसुत्री

228
Raj Thackeray यांचा पायगुण; 'त्या' चार लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विजयी

तब्बल २१ वर्षांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतिर्थावर एकाच मैदानावर एकत्र आले. मात्र, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण करताना राज ठाकरे यांनी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे असा उल्लेख मोदी यांचा केला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपले आक्रमक भाषण न करता नरेंद्र मोदी यांच्यासमोर मुंबई महाराष्ट्राच्या विकासाची पंचसुत्रीच मांडली. मराठी भाषेला अभिजात दर्जा, पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास, शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना गत वैभव, रखडलेला गोवा महामार्ग आणि मुंबईच्या लोकल सेवांसाठी अधिक निधी देणे अशाप्रकारच्या पाच प्रमुख मागण्या राज ठाकरे यांनी करून पुढील पाच वर्षांत त्या पूर्ण केल्या जाव्यात अशी विनंती केली. (Raj Thackeray)

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे महायुतीचा लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत बोलतांना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे २१ वर्षांनी शिवतिर्थावर आले आहेत. तेव्हा आपण कमळातून बाहेर आला होता,  २०१४ साली आपण कमळाला बाहेर काढले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर बोलण्याचे टाळत, यापूर्वीच्या नेत्यांनी केलेल्या विधानाचा आधार घेत राज ठाकरे म्हणाले, जे सत्तेत येणार नाही त्यांच्यावर का बोलावे, काही आवश्यकता आहे का असा सवाल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांबाबत धन्यवाद देत, मोदी होते म्हणून रामाचे मंदिर होऊ शकले, अन्य कुणी असते तर होऊच शकले नसते. कलम ३७० रद्द व्हावे ही अनेक वर्षांपासूनच मागणी होती, ती मागणी मान्य झाली नव्हती, ते कलम पंतप्रधान होताच नरेंद्र मोदींनी हटवले. मुस्लिमांमधील तलाक तो विषयच बंद केला, या सर्वांना मी धाडसी निर्णय मानतो. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Narendra Modi : मोदी विकसित भारत देऊन जाईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना दिला विश्वास)

आपण अनेक योजना राबवल्या आता मी पुढील पाच वर्षांसाठी आपल्यासमोर अपेक्षा व्यक्त करण्यासाठी उभा आहे. त्या अपेक्षा मी आज बोलून दाखवतो. माझी पहिली अपेक्षा आहे ती म्हणजे अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. या भाषेला सन्मान मिळेल, अशी गोष्ट करा, या देशात हजार वर्षांपूर्वी १२५ वर्षे मराठा साम्राज्य होते, त्या मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात घेतला जावा. समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा कधी होईल हे माहित नाही, पण शिवछत्रपतींचे गड-किल्ले आहेत, या सर्वांना पुर्वीचे ऐतिहासिक वैभव मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय समिती नेमली जावी, या देशात रस्ते, पुल आपण बनवता पण माझी कळकळीची विनंती आहे की मागील १८ ते १९ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्गांचा युद्धपातळीवर विकास करावा. याशिवाय लाखो प्रवाशी हे लोकलमधून प्रवास करतात, यावर आपण स्वत: बारीक लक्ष द्यावे यासाठी पैसे देण्यासाठी या लोकल रेल्वेकडे पहावे अशाप्रकारची विकासाची पंचसुत्रींची त्यांनी मोंदीसमोर मांडली. (Raj Thackeray)

बाबासाहेबांच्या संविधानाला आपण धक्का लावणारच नाही. पण जे विरोधक प्रचार करतात त्यांची तोंडे बंद करावीत. आज करोडो मुसलमान या देशावर प्रेम करतात, त्यांची निष्ठा या देशावर आहे. पण काही मुठभर मुसलमान असे आहेत की ज्यांना दहा वर्षांत डोके वर काढता आलेले नाही, ते मुठभर लोक  उध्दव ठाकरे व काँग्रेसला पाठिंबा देत आहेत, कारण त्यांच्यासाठी हा मार्ग सुलभ आहे. पण लाखो करोडो मुसलमान आपल्यासोबत आहेत. तो देशाचा नागरीक आहे, तो काम करणारा आहे, कुटुंबासोबत राहणारा आहे, ज्यांना मोदी हवे आहेत. पण मुठभर मुसलमानांची काही अवलाद त्यांना मोदी नको, त्यामुळे या मुठभर अवलादींचे जे अड्डे आहेत, ते अड्डे एकदा तपासून घ्या, देशाचे सैन्य तिथे घुसवा आणि या देशाला कायमचे सुरक्षित बनवा असे राज ठाकरेनी म्हटले. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.