Narendra Modi : मोदी विकसित भारत देऊन जाईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना दिला विश्वास

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील महायुतीची विराट सभा शुक्रवारी १७ मे ला छत्रपती शिवाजी महाराज पार्कला आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदी बोलत होते.

165
Narendra Modi : मोदी विकसित भारत देऊन जाईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना दिला विश्वास
  • सुजित महामुलकर
“मोदी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईल,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना दिला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील महायुतीची विराट सभा शुक्रवारी १७ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कला आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदी बोलत होते. (Narendra Modi)
लवकरच भारत जगातील तिसरी महासत्ता 
मोदी पुढे म्हणाले की आपण ‘२४*७ फॉर २०४७’ हा मंत्र घेऊन तुमच्यासाठी आणि या देशासाठी जीव ओतून कामाला लागलो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “पुढच्या वेळी मी येईन तेव्हा भारत जगातील तिसरी महासत्ता झालेला असेल. असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले, “तिसरी महासत्ता बनवणार ही मोदीची गॅरंटी आहे.”  (Narendra Modi)
…तर देश पाच दशकं पुढे असता
“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजी यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस भंग केली असती तर आज भारत देश किमान ५ दशकं पुढे असता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील सर्व संस्थांचे काँग्रेसीकरण झाले आणि त्याने देशाचे पाच दशक वाया घालवले,” असे मोदी यांनी सांगितले.  (Narendra Modi)
देश ११ वरून ५ व्या क्रमांकावर आणला
“देश स्वतंत्र झाला तेव्हा देश जगात सहाव्या क्रमांकावर होता. दहा वर्षापूर्वी काँग्रेसने सत्ता आमच्याकडे सुपूर्द केली तेव्हा सहावरून तो ११व्या स्थानी होता तो आता गेल्या १० वर्षात ५व्या क्रमांकावर आणला आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर आणू,” अशी गॅरंटी मोदी यांनी दिली. आज भारतीय शेअर बाजार चौथ्या क्रमांकावर असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. (Narendra Modi)
या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे तसेच मुंबईतील महायुतीचे सर्व सहा मतदारसंघांतील उमेदवार उपस्थित होते.  सोमवारी २० मे रोजी पाचव्या टप्प्यासाठी १३ मतदार संघात मतदान होणार आहे.  (Narendra Modi)
रंग बदलणारा सरडा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर टीका करत उबाठा रंग बदलणारा सरडा असल्याचे म्हटले. “स्वातंत्र्यावीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसता. बाळासाहेबांचे विचार, आचार सोडले, २०१९ मध्ये युतीला दिलेला कौल धुडकावून जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून तुमची नकली शिवसेना आहे. ‘उबाठाका हात काँग्रेसके साथ’, बाळासाहेबांचा शिवसैनिक काँग्रेसला कधीही मतदान करणार नाही,” असा घणाघात शिंदे यांनी केला.  (Narendra Modi)
हिंदू सोडले…
फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ”याच मैदानावर इंडी आघाडीची सभा झाली त्या सभेत काँग्रेसला आवडत नाही म्हणून ‘माझ्या हिंदू बंधू, भगिनी आणि मातांनो’ ही भाषणाची सुरुवात सोडली. आता ते हिंदू म्हणत नाहीत. बाळासाहेबांच्या नावावर कॅलेंडर काढतात आणि जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटले जाते. पाकिस्तानचे झेंडे महाविकास आघाडीच्या प्रचारात वापरले जातात,” असे फडणवीस म्हणाले. (Narendra Modi)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.