राज्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) प्रचार सभांचा जोर शिगेला पोहोचला आहे. चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, पाचव्या टप्प्यातील प्रचार सभा चालू आहेत. भारताची आर्थिक राजधानी असेलल्या मुंबईत महायुती सांगता सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची एकाच मंचावर बघायला मिळाले. तसेच यावेळी महायुतीचे तिन्ही पक्षातील नेते मंडळींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. दरम्यान सभेत भाषणाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. (Devendra Fadanvis)
(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन)
शुक्रवारी महायुतीची सांगता सभा मुंबई दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे संपन्न झाली. सभेत भाषणावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पूर्वी भाषणात बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) गर्जना ऐकायला मिळायची. बाळासाहेब म्हणायचे, माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. मात्र उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीचा हात सोडून महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केल्यानंतर त्यांना हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले. ही शोकांतिका आहे असे फडणवीस म्हणाले. तसेच इंडी आघाडी सोबत उद्धव ठाकरे यांची बैठक झाल्यानंतर ठाकरे यांनी “माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो…” बोलणं सोडून दिले. असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत केले.
बाळासाहेबांची सभा व्हायची तेव्हा भगवा झेंडा, कडवट हिंदू, शिवरायांचे मावळे असे शब्द ऐकायला मिळायचे. आता उद्धव ठाकरेंच्या भाषणात बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझे कुटुंब माझी जबाबदारी यापलिकडे काही ऐकायला येत नाही’, असा टोला फडणवीसांनी लगावला.
(हेही वाचा – अनिल देशमुख यांनी उपकाराची जाणीव ठेवावी; Sunil Tatkare यांचा इशारा)
फडणवीस म्हणाले की, कोव्हिडच्या काळात मोदींनी देशातील शास्त्रज्ञांना एकत्र करुन भारतात लस तयार केली आणि १४० कोटी भारतीयांना दिली. तेव्हा उद्धव ठाकरे सरकार खिचडीचा घोटाळा करत होते, रेमडिसिव्हीरचा घोटाळा चालवत होते, ऑक्सिजनचा घोटाळा सुरू होता. प्रेतावरचे लोणी खाण्याचे काम सुरू होते. यांना धडा शिकवला पाहिजे,’ अशी टाकाही फडणवीसांनी केली. (Devendra Fadanvis)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community