न्यायालयामध्ये चोरी करणाऱ्या एका महिला वकिलाला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. या वकील महिलेने मुंबई उच्च न्यायालयासह अनेक न्यायालयात चोऱ्या केल्याची माहिती कुर्ला पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी वकील महिलेला कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २० मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Crime)
बबिता जितेंद्र मलिक (३७) असे अटक करण्यात आलेल्या वकील महिलेचे नाव असून ती चेंबूर येथील गायकवाड नगर येथे एकटीच राहण्यास आहे. पेशाने वकील असलेल्या बबिता मलिक या वकील महिलेची आर्थिक परिस्थिती बिकट होती. तिला काम मिळत नव्हते, त्यामुळे स्वतःचा खर्च भागविण्यासाठी बबिता छोट्या-मोठ्या चोऱ्या करू लागली अशी माहिती कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली. (Crime)
(हेही वाचा – भारताचे Constitution खरोखरच धोक्यात आहे का?)
ट्रोम्बे येथे राहणाऱ्या एका वकील महिलेने कुर्ला पोलीस ठाण्यात पर्स चोरीची तक्रार दाखल केली होती. तक्रारदार वकील महिलेची बॅग कुर्ला न्यायालयातून चोरीला गेली होती, कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी कुर्ला न्यायालयातील सीसीटीव्ही तपासले असता वकिलाच्या वेशात असलेली एक महिला पर्स चोरी करीत असताना दिसून आली, पोलिसांनी या महिलेची माहिती काढली असता ही महिला वकील असून तिचे नाव बबिता मलिक असल्याचे समोर आले. (Crime)
कुर्ला पोलीस ठाण्याचे वपोनि. अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर निमजकर, श्वेता पाटील, सीमा झिंजे आणि पथक यांनी या महिलेचा शोध घेऊन चेंबूर येथून अटक करण्यात आली. बबिता मलिक हिच्यावर आझाद मैदान, कुलाबा पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती वपोनि. खोत यांनी दिली. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community