Ghatkopar Hoarding Accident : इगो मीडिया कंपनीत बड्या राजकीय नेत्यांची गुंतवणूक; भिंडेच्या चौकशीत होणार नावे उघड

227
Ghatkopar Hoarding Accident : इगो मीडिया कंपनीत बड्या राजकीय नेत्यांची गुंतवणूक; भिंडेच्या चौकशीत होणार नावे उघड

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भावेश भिंडेच्या चौकशीत ‘एगो मीडिया’ कंपनीचे ‘स्लीपिंग पार्टनर’ (निनावी गुंतवणूकदार) यांची नावे समोर येण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे. भिंडे याला मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने शुक्रवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने भिंडेला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर पूर्व येथे सोमवारी वादळी पावसामुळे पेट्रोल पंपावर बेकायदेशीर असलेले महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १६ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी ‘इगो मीडिया’कंपनीचा मालक भावेश भिंडे सह कंपनीचे संचालक, सिव्हिल कंत्राटदार आणि इतर संबंधित व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर फरार झालेल्या भावेश भिंडे याला गुरुवारी राजस्थानच्या उदयपूर येथून मुंबई गुन्हे शाखेने अटक करण्यात आली होती. शुक्रवारी भिंडेला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – Pune Airport: दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकले, विमान उड्डाण रद्द)

एगो मीडिया कंपनीने घाटकोपर येथे लोहमार्ग पोलिसांच्या जागेवर उभारलेले महाकाय होर्डिंग हे बेकायदेशीर होते, व या होर्डिंगला २०२१ मध्ये लोहमार्ग पोलिस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी परवानगी दिली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भावेश भिंडे याने सुरू केलेली इगो मीडिया कंपनीमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी आर्थिक गुंतवणूक केलेली आहे. भावेश भिंडे हा केवळ मोहरा असून त्याच्या कंपनीला गुंतवणूक करणारे ‘स्लीपिंग पार्टनर’ ( निनाव गुंतवणूकदार) चे नावे भिंडेच्या चौकशीत समोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.