BJP उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड

362
Mihir Kotecha यांच्या कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल; ५ जणांना अटक

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसह राज्यातील एकूण 13 जागांवर येत्या 20 मे ला मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मोठमोठ्या सभा पार पडत आहेत. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना आणखी राजकीय एक मोठी घटना घडली आहे. मुंबईत ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. भाजपचे (BJP) उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या मुंलुंड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी मोठा राडा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस स्वत: महायुतीची शिवाजी पार्क येथील सभा आटोपल्यानंतर मिहीर कोटेचा यांच्या मुलुंड येथील सभास्थळी दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप आमदार प्रसाद लाड देखील महिरी कोटेचा यांच्या  (BJP)  कार्यालयात दाखल झाले. एकीकडे महायुतीची शिवाजी पार्क येथे पंतप्रधान मोदी हे भव्य प्रचारसभेला संबोधित करत असताना दुसरीकडे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटात मोठा राडा होत होता. या मतदारसंघात भाजपकडून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिर कोटेचा यांच्याकडून पैशांचे वाटप केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. याच आरोपांवरुन ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यावेळी मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

(हेही वाचा मला संपवायला आले आहात, महाराष्ट्र तुमचे राजकारण याच मातीत गाडेल; Uddhav Thackeray यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल)

भाजप कार्यकर्त्यांचा दावा काय?

आम्ही दादरला चाललो होतो. पण कार्यालयासमोर काही महिला पैसे घेऊन शिवीगाळ करत होत्या. 50 महिला इथे उभ्या राहिल्या. आमच्या पक्षाला शिव्या घालतात, आमच्या नेत्याला शिव्या घालतात. मग आम्ही काय ऐकून घेणार? आम्ही सगळे पदाधिकारी आहोत. ते पैसे घेऊन आलेल्या बायका आहेत. आम्हाला चोरलोकं नकोत. आम्हाला गुंडागर्दी नको. ही गुंडागिरी चालणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या महिला कार्यकर्त्याने दिली.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप काय?

पोलीस काही करत नाही. कारण पोलिसांना पैसे दिले आहेत. पोलीस सेट आहेत. भाजपच्या मिहीर कोटेचा यांनी जे केलं, मराठी माणसाला त्रास देता ना, आता बघ मराठी माणासाची ताकद काय आहे ते. हे चोर आहेत. आमच्या बहिणीला ढकलले आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस व्हॅनमध्ये अटक केलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.