Behramji Malabari : कवी मनाचा समाजसेवक बेहरामजी मेरवानजी मलबारी

बेहरामजी मेरवानजी मलबारी यांचा जन्म १८ मे १९५३ साली गुजरात राज्यातल्या बडोदा येथे झाला.

177
Behramji Malabari : कवी मनाचा समाजसेवक बेहरामजी मेरवानजी मलबारी
Behramji Malabari : कवी मनाचा समाजसेवक बेहरामजी मेरवानजी मलबारी

बेहरामजी मेरवानजी मलबारी (Behramji Malabari) हे एक भारतीय कवी, प्रचारक, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी, संरक्षणासाठी तसेच बालविवाहाच्या विरोधात लढा दिला. बालविवाह ही प्रथा बंद पाडण्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवायचे. त्या उपक्रमांच्या माध्यमातून ते जनजागृती करायचे. ते आपल्या सडेतोड वक्तृत्वासाठी प्रसिद्ध होते.

बेहरामजी मेरवानजी मलबारी (Behramji Malabari) यांचा जन्म १८ मे १९५३ साली गुजरात राज्यातल्या बडोदा येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव धनजीभाई मेहता असं होतं. ते बडोदा संस्थानामध्ये कारकून म्हणून काम करायचे. बेहेरामजी यांचे वडील अतिशय सौम्य आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या आईचं नाव भिखिबाई असं होतं.

(हेही वाचा – Raj Thackeray: “ओवैसींसारख्या ज्या औलादी आहेत, त्यांचे…”, पंतप्रधान मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडाडली)

बेहेरामजी (Behramji Malabari) सहा-सात वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांची आई त्यांना सुरतला घेऊन गेली. बेहेरामजी यांचं शिक्षण सुरतच्या ‘आयरिश प्रेस्बिटेरियन मिशन स्कूल’ येथे झालं. काही काळाने मलबारच्या समुद्रकिनारी राहणारे मेरवानजी नानाभाई मलबारी यांनी बेहरामजी यांच्या आईसोबत लग्न केलं आणि बेहेरामजी यांना दत्तक घेतलं. म्हणूनच त्यांना मलबारी असं नाव मिळालं. मेरवानजींचं हे तिसरं लग्न होतं.

१९७५ सालच्या सुरुवातीला बेहेरामजी यांनी लिहिलेला गुजराती भाषेतला कवितांचा एक खंड प्रकाशित झाला. त्यानंतर १८७७ साली त्यांचं ‘द इंडियन म्युस इन इंग्लिश गार्ब नावाचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाने इंग्लंडमध्येही धुमाकूळ घातला. बेहेरामजी यांच्या या पुस्तकाने इंग्लंडमधील लेखक अल्फ्रेड टेनिसन, मॅक्स म्युलर आणि फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचही लक्ष वेधून घेतलं.

(हेही वाचा – राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल…; PM Modi यांचे शरद पवारांना आव्हान)

म्युलर आणि नाइटिंगेल यांनी बेहेरामजी यांच्या सामाजिक सुधारणांच्या मोहिमांतही महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. त्यानंतर १८८८ ते १८९२ सालच्या दरम्यान बेहेरामजी मलबारी यांचं चरित्र लिहिलं गेलं तेव्हा त्यांनी त्या चरित्रासाठी प्रस्तावनासुद्धा लिहिली होती.

मलबारी यांच्या कारकिर्दीचीची सुरुवात १८८० साली झाली. सुरुवातीला त्यांनी ‘इंडियन स्पेक्टेटर’ नावाचं इंग्रजी भाषेतलं एका दैनिकाचं संपादन केलं. हे संपादकीय पद त्यांनी वीस वर्षं सांभाळलं. त्यानंतर त्यांनी ‘व्हॉइस ऑफ इंडिया’साठी दादाभाई नौरोजी आणि विल्यम यांच्या सोबत एकत्रित संपादन केलं.

त्यानंतर बेहरामजी (Behramji Malabari) यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ‘ईस्ट अँड वेस्ट’ नावाच्या मासिकाचं संपादक पद सांभाळलं. १२ जुलै १९१२ साली शिमला येथे त्यांच्या त्यांच्या राहत्या घरी त्यांना देवाज्ञा झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.