South Mumbai LS Constituency : यामिनी ‘यशवंत’च! सावंतांची रोखणार विजयाची हॅटट्रीक?

यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळाल्यामुळे उबाठा शिवसेनेला ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही.

256
Lok Sabha Election 2024 : कुलाबा मतदार संघात का झाले कमी मतदान, काय आहेत कारणे, जाणून घ्या!
Lok Sabha Election 2024 : कुलाबा मतदार संघात का झाले कमी मतदान, काय आहेत कारणे, जाणून घ्या!
  • सचिन धानजी,मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात (South Mumbai LS Constituency) विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) हे उबाठा शिवसेनेचे उमेदवार असून शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव (Yamini Jadhav) यांच्याशी त्यांची प्रमुख लढत आहे. यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आपण विजयीच झालो या अविर्भावात उबाठा शिवसैनिक वावरत असले आता पर्यंत नगरसेवक पद आणि आमदारकीची निवडणूक त्यांनी पहिल्याच दमात जिंकलेली आहे. त्यामुळे त्या कायमच यशवंत ठरल्याने उबाठा शिवसेनेला ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. मात्र, आजवर सावंत हे भाजपाच्या पाठबळावर निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना भाजपाशिवायही मी निवडून येवू शकतो हे दाखवण्याची सुवर्णसंधी आहे. तर भाजपाला दक्षिण मुंबईचा गड आपलाच आहे हे दाखवण्यासाठी झटून काम करावे लागणार आहे.

कारण यामिनी जाधव (Yamini Jadhav) विजयी झाल्यास तो निश्चितच भाजपालाचा विजय मानला जाणार आहे, हे लक्षात घेत भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यामिनी ‘यशवंत’ ठरुन सावंत यांना विजयापासून रोखतात का? की सावंत आपल्या विजयाची हॅटट्रीक करतात याकडेच मतदारांचे लक्ष राहणार आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : ‘गर्व से कहो हम हिंदू है’, बोलायची हिंमत उद्धव मध्ये राहिली नाही!)

तराजू कुठे झुकणार?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात (South Mumbai LS Constituency) शिवसेनेच्या यामिनी जाधव, उबाठा शिवसेनेच्या अरविंद सावंत, (Arvind Sawant) वंचित बहुजन आघाडीचे अफझल दाऊदानी, बहुजन समाज पार्टींचे मोहम्मद शोएब बसीर खतीब यांच्यासह १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यातील सात उमेदवार हे अपक्ष आहेत. या लोकसभा मतदार संघातील कुलाबा, मलबारहिल हिल आणि भायखळा हे तिन विधानसभा क्षेत्र शिवसेना-भाजपाकडे आहेत, वरळी आणि शिवडी उबाठा शिवसेना व मुंबादेवीचा मतदार संघ काँग्रेसकडे. त्यामुळे महायुतीकडे तीन विधानसभा क्षेत्र आणि महाविकास आघाडीकडे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. त्यामुळे लढाई ही बरोबरीची मानली जात आहे. सध्या येथील तराजू कुणाच्या बाजुने आहे हे सांगता येत नसले तरी २० मे रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानात कुणाच्या बाजुने झुकवायचा हे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हाती आहे.

नाराज हा विरोधकांचा भ्रम

या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला दावा सांगत त्यानुसार मतदार संघाची बांधणी करायला सांगितली होती. त्यानुसार, विधानसभेचे अध्यक्ष आमदार राहुल नार्वेकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मतदार संघाची बांधणी करायला लागले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात राहुल नार्वेकर यांचे नाव मागे पडले आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला होता. परंतु ही जागा शिवसेनेची असल्याने त्यांनाच सोडण्याचा निर्णय भाजपाच्या पक्षश्रेष्ठीने घेतला. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राहुल नार्वेकर आणि लोढा हे नाराज असल्याने जाधव यांचे काम करणार नाही आणि ही जागा आता आपण मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत सहज जिंकू असा विश्वास उबाठा शिवसेनेला वाटत आहे.

मात्र, दुसरीकडे मंगलप्रभात लोढा आणि ऍड राहुल नार्वेकर यांनी आम्ही पक्षाशी प्रामाणिक असून जेव्हा पक्षाचे आदेश होते, कामाला लागा. तेव्हा कामाला लागून मतदार संघाची बांधणी केली. पण पक्षाने आता उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही नाराज असण्याचे कोणतेही काम नसून विरोधक केवळ स्वत:च्या मनाचे समाधान करत आहे.

(हेही वाचा – Haryana Bus Fire: हरियाणामध्ये भाविकांच्या बसला भीषण आग; १० जणांचा मृत्यू, २४ जखमी)

पक्षाचे आदेश शिरसावंद्य

उलट आम्हीही बांधणी केल्याने याचा फायदा महायुतीच्या उमेदवारालाच होणार आहे. मुळात पक्षाचा आदेश हा आमच्यासाठी शिरसावंद्य असून पंतप्रधानांचे ‘अब की बार ४०० पार’ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही विभागात जोमाने काम करत आहोत. प्रत्येक उमेदवार हा नरेंद्र मोदीच आहेत असे समजून आम्ही काम करत असून यामिनी जाधव या निश्चितच विजयी होतील असा विश्वासही ते विविध बैठका आणि प्रचार सभांमधून व्यक्त करत आहेत. त्यामुळे मागील वेळेपेक्षाही यावेळेस कुलाबा आणि मलबारहिलमधून सर्वांधिक मतदान महायुतीच्या उमेदवाराला होईल,असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसची ताकद यामिनी जाधव यांच्यासोबत

अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना आता भाजपा ऐवजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. त्यामुळे वरळी आणि शिवडी मतदार संघांवर त्यांचा अधिक जोर आहे. त्यानंतर मुंबादेवीतून सर्वांधिक मते घेण्याचा प्रयत्न असेल. परंतु यापूर्वी दोन वेळा पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार आणि राज्य सभा सदस्य असलेले मिलिंद देवरा हे शिवसेनेत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील काँग्रेसची ताकद यामिनी जाधव यांच्यासोबत आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये काही मते ही देवरा कुटुंबाची स्वत:ची आहेत. जी मते आता सावंत यांना न जाता जाधव यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न देवरांचा असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.