Deep Cleaning Drive : सखोल स्वच्छता मोहिमेला मिळते यश, हवेतील प्रदूषणात होते घट

प्रदूषण कमी झाल्यामुळे जनतेकडून समाधान व्यक्त.

186
Deep Cleaning Drive : सखोल स्वच्छता मोहिमेला मिळते यश, हवेतील प्रदूषणात होते घट

मुंबईमध्ये मागील जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात धुळीचे साम्राज्य पसरून निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेला यश येत आहे. विभागांतील स्वच्छता आणि रस्ते पाण्याने धुत केल्या जाणाऱ्या साफसफाईच्या मोहिमेमुळे (Deep Cleaning Drive) धुळीचे प्रदूषण कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेषतः दक्षिण मुंबईतील नागरिकांना या धुळीचा सर्वाधिक त्रास होत होता. मात्र या प्रदुषित हवेचे प्रमाण कमी करण्याच्या या समस्ये बाबत दक्षिण मुंबईकर हे महापालिका आणि राज्य सरकार यांच्या कामावर खुश झालेले पाहायला मिळत आहेत. (Deep Cleaning Drive)

हवेतील प्रदूषणाच्या वाढती समस्या आणि लोकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक तत्कालिन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाली. या बैठकीत आयुक्त चहल यांनी धूळ व प्रदूषण नियंत्रासाठीचे विविध निर्देश देतानाच सक्त सूचनाही केल्या. (Deep Cleaning Drive)

(हेही वाचा – Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या मागण्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?)

रस्ते धुतल्यामुळे धुळीची समस्या झाली कमी

यानंतर बांधकामांसाठी मार्गदर्शक धोरण बनवून त्यांची अंमलबजावणी करताना मुंबईतील हवेतील या वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्याचा एक भाग म्हणून रस्तेही पाण्याने धुण्याचे काम हाती घेतले. हे रस्ते पाण्याने धुण्यासाठी सुरुवातीला १२१ टॅकरचा वापर केला जात असला तरी टप्पा टप्प्याने ही संख्या वाढवून २५० टँकरच्या मदतीने रस्ते धुण्याचे काम दर शनिवारी सखोल स्वच्छ्ता मोहीम (Deep Cleaning Drive) राबवून हवेतील हे प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्न केला आहे. विद्यमान पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे मार्गदर्शनाखाली मुंबईत २३ ते २४ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. (Deep Cleaning Drive)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार तसेच शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने यासाठी राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेत (Deep Cleaning Drive) एका हजार हून अधिक रस्ते पाण्याने धुतले जातात. एवढेच नाही तर प्रत्येक शनिवारी ही मोहीम राबवून १०० ते १२५ मेट्रिक टन राडारोडा उचलला जातो. तसेच टाकाऊ मोठ्या वस्तू आणि कचरा उचला जातो. त्यामुळे कचरा आणि टाकाऊ वस्तू यामुळे अस्वच्छता निर्माण झाली तसेच डम्पिंग ग्राउंडचे ढीग लागले त्याचे प्रमाण कमी होऊन अनेक परिसर स्वच्छ, सुंदर आणि दुर्गंधी मुक्त बनल्याचे पाहायला मिळत आहे, शिवाय रस्ते धुतले जात असल्याने धुळीची समस्या कमी झाली आहे. यामुळे हवेतील चांगल्या गुणवत्ता सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले आहे. मुंबादेवी मंदिर परिसर स्वच्छ राखला जात असल्याने या भागातील जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मलबार हिल भागातील रहिवाशांकडून महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून रहिवासी हे यावेळी याबाबत समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. (Deep Cleaning Drive)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.