- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ३५ वर्षांचा झाला तरी अजून भारतीय क्रिकेटमधील सगळ्यात भरवशाचा फलंदाज आहे. त्याची कामगिरी त्याला जगातील अनेक कसदार फलंदाजांपेक्षा वेगळी ठरवते, त्याला अढळ स्थान मिळवून देते. सर्व प्रकारच्या खेळपट्ट्या आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाज यांच्यासमोर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण, विराट तरुण असताना महेंद्र सिंग धोनीने त्याची कारकीर्द घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे, असं विधान अलीकडेच सुनील गावस्कर यांनी केलं आहे. (Virat Kohli)
‘विराट कोहलीने कारकीर्द सुरू केली, तेव्हा तो ‘थांबला, मग पुन्हा सुरू झाला’ अशाप्रकारे चाचपडत होता. पण, धोनीने त्याला संघात बळकटी दिली आणि विश्वासही दिला,’ असं गावस्कर म्हणाले. अलीकडे विराटच्या धिम्या स्ट्राईकरेटवरून त्याच्यावर टीका झाली होती. तेव्हा गावस्कर आणि विराट यांच्यात थोडं शाब्दिक युद्ध रंगलं होतं. (Virat Kohli)
(हेही वाचा – ऐन निवडणुकीत Sanjay Raut यांच्या अडचणींत वाढ; गुन्हा दाखल)
‘तुमचा स्ट्राईक रेट ११८ असेल आणि तुम्ही १४ षटकं खेळून या स्ट्राईक रेटने धावा काढून बाद झालात, तर संघासाठी याचा काहीतरी वेगळा अर्थ निघतो,’ असं सरुवातीला गावस्कर म्हणाले होते. त्यावर विराटने ही काहीसं खरमरीत उत्तर दिलं होतं. ‘माझ्या स्ट्राईकरेटवर अनेक जण बोलत आहेत. पण, माझा मतलब संघाला विजय मिळवून देण्यात आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि मागची १५ वर्षं केलाय. ज्यांना मैदानात काय परिस्थिती आहे ते माहीत नसेल, त्यांनी बोलू नये,’ असं विराट म्हणाला होता. (Virat Kohli)
गावस्कर यांनी हे विधानही वैयक्तिकरित्या घेतलं होतं. आपणही थोडंफार क्रिकेट खेळलो आहोत, ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती आणि नंतर ते म्हणाले, ‘काही फलंदाज मैदानाबाहेर जे लोक बोलतात त्यांना अनावश्यक गोंगाट म्हणून हेटाळणी करतात. पण, मग त्यांना फरक पडत नसेल तर ते अशा गोंगाटाला ऐकतात तरी का आणि प्रतिसाद का देतात?’ अशा देवाण घेवाणीनंतर बंगळुरू आणि चेन्नईच्या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी गावसकर यांनी पुन्हा एकदा एका वादाला सुरुवात केली आहे. सामन्यातही त्यांना चेन्नईचं पारडं जड वाटतं. (Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community