Monsoon Fishing: दोन महिने मासेमारीस मनाई, नौकांना समुद्रात जाण्यास बंदी!

155
Monsoon Fishing: दोन महिने मासेमारीस मनाई, नौकांना समुद्रात जाण्यास बंदी!
Monsoon Fishing: दोन महिने मासेमारीस मनाई, नौकांना समुद्रात जाण्यास बंदी!

मान्सूनपूर्व (Monsoon) पाऊसानंतर यंदा लवकरच मान्सूनची (Monsoon Fishing) हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, पावसाळ्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. मच्छिमारांसाठी व नौका पर्यटकांसाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 1 ते 31 जुलै या कालावधीत 2 महिन्यांसाठी मासेमारी (Fishing) करण्यास मनाई करण्यात आली आहे. (Monsoon Fishing)

(हेही वाचा –ऐन निवडणुकीत Sanjay Raut यांच्या अडचणींत वाढ; गुन्हा दाखल)

मच्छिमारी (Monsoon Fishing) सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांना महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी 01 जून ते 31 जुलै 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशी माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली आहे. (Monsoon Fishing)

(हेही वाचा –Deep Cleaning Drive : सखोल स्वच्छता मोहिमेला मिळते यश, हवेतील प्रदूषणात होते घट)

सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई काय?

1) पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील.

2) पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.

3) समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि. 01 जून 2024 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि. 31 जुलै 2024 वा त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही.

4) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण / मार्गदर्शक सुचना/ आदेश लागु राहतील.

5) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.

6) पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.

7) बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिध्द आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.