Mihir Kotecha यांच्यासाठी राज ठाकरे आणि नारायण राणे उतरले मैदानात; भांडुपसह विक्रोळी, घाटकोपरमध्ये केला प्रचार

गेले दोन महिने मनसे ज्या ताकदीने कोटेचा यांच्या प्रचारात उतरली तोच आवेग पुढील दोन दिवस कायम ठेवा, असे आदेशही राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले.

187
Lok Sabha Election Result 2024 : मोदींचा रोड शो आणि राज ठाकरेंच्या शाखा भेटीनंतरही कोटेचांचा पराभव

ईशान्य मुंबईतील भाजपाचे उमेदवार आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपर परिसरात प्रचार फेरी काढल्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या केंद्रीय मंत्री नारायण राणेही प्रचारासाठी रस्त्यावर उतरले. नारायण राणे यांनी भांडुपमधील कोकणी माणसांना साद घालून कोटेचा यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे, तर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घाटकोपर, विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मनसेच्या शाखांना भेटी देत प्रचार कामाचा आढावा घेतला. राज ठाकरे यांची ही रॅली म्हणजे जाणीवपूर्वक मराठी आणि अमराठी मुद्दा पेटवण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून होतोय तो शमवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. (Mihir Kotecha)

ईशान्य मुंबईतील भाजपा, शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ शनिवारी ईशान्य मुंबईचा दौरा केला. घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप येथे राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडून महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेत पुढील दोन दिवसांसाठीच्या व्यूहरचनेबाबत मार्गदर्शन केले. महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. राज ठाकरे यांनी शनिवारी घाटकोपर पश्चिमेतील भटवाडी येथील गणेश मंदिरात दर्शन घेऊन कोटेचा यांच्या प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्यासोबत कोटेचा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारही होते. विकसित भारतासाठी महायुतीच्या उमेदवाराना विजयी करण्यासाठी गणरायाकडे राज ठाकरे यांनी साकडे घातले. मनसे अध्यक्ष यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना कोटेचा यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले, असे शेलार म्हणाले. (Mihir Kotecha)

(हेही वाचा – Mutual Fund : भारतीय म्युच्युअल फंड संस्थांना परदेशी फंडांत गुंतवणुकीची परवानगी?)

गेले दोन महिने मनसे ज्या ताकदीने कोटेचा यांच्या प्रचारात उतरली तोच आवेग पुढील दोन दिवस कायम ठेवा, असे आदेशही राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. या दौऱ्यात मनसे नेते नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रीटा गुप्ता, शिरीष सावंत आणि इतर प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. कोटेचा (Mihir Kotecha) यांनीही मनसे कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. मनसेने महायुतीतील मित्रपक्षांना वेळोवेळी पाठिंबा दिला आहे आणि सहकार्यही केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आभारी आहे. तसेच येत्या २० मे रोजी मोठ्या संख्येने लोकांना एकत्र करून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन केले, असे कोटेचा यांनी सांगितले. (Mihir Kotecha)

नारायण राणेंचा भांडुपमध्ये प्रचार

शनिवारी सकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भांडुप (पश्चिम) येथील कोटेचा यांच्यासाठी प्रचार केला. “स्थानिक कोकणी लोकांचा उत्साह थक्क करणारा होता. आपले लाडके नेते, कोकण सुपुत्र राणे साहेब यांना पाहण्यासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांची संख्या आणि इतक्या उन्हात त्यांचा असलेला उत्साह स्पष्टपणे सांगत होता की त्यांनी विकसित भारतासाठी मोदीजींना मत देण्याचा निर्णय घेतला आहे, असे कोटेचा म्हणाले. (Mihir Kotecha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.