Mihir Kotecha यांच्या कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल; ५ जणांना अटक

177
Mihir Kotecha यांच्या कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल; ५ जणांना अटक

ईशान्य मुंबईतील वातावरण तापले आहे, शुक्रवारी मुलुंड येथे झालेल्या राड्या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुलुंड पश्चिम येथील भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या निवडणूक वॉर रूमवर शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते, त्यांनी निवडणूक वॉर रूम मधून मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप सुरू असल्याच्या संशयावरून घोषणाबाजी करून वॉर रूमच्या आता घुसण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तात्काळ निवडणूक वॉर रूमचा ताबा घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रोखण्याच्या प्रयत्न केला. या दरम्यान या ठिकाणी जमलेल्या जमावापैकी पोलिसांना न जुमानता वॉर रूमची तोड फोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला अटकाव करून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. (Mihir Kotecha)

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या निवडणूक वॉर रूमची तोडफोड केल्याचा आरोप भाजपा उमेदवार मिहिर कोटेचा यांनी केला आहे. कोटेचा यांनी पाटील यांच्यावर आरोप करण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या आठवड्यात कोटेचा यांनी मानखुर्दजवळ त्यांच्या रोड शोवर दगडफेक केल्याचा आरोप केला आणि त्याआधी त्यांचा निवडणूक रथ फोडला गेल्याचा आरोप कोटेचा यांनी केला होता. शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटले जात होते म्हणून त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. मात्र कोटेचा यांनी पैसे वाटल्याचा आरोप फेटाळून लावला. (Mihir Kotecha)

(हेही वाचा – Best Bus: मतदानाच्या दिवशी बेस्टकडून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास )

परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी तोडफोडीच्या ठिकाणी भेट दिली आणि आरोप आणि त्यानंतर झालेल्या तोडफोडी बाबत माध्यमांशी संवाद साधला. भाजपकडून मतांसाठी पैसे वाटले जात असल्याचा दावा शिवसेनेच्या उबाठा गटाने केल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणीत या आरोपांमध्ये तथ्य आढळून आले नाही. “परिस्थिती नियंत्रणात आहे आणि परिसरातील तणाव कमी झाला आहे,” असे कराड म्हणाले. दरम्यान मुलुंड येथे झालेल्या राड्याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांविरुद्ध भा.द.वि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे), ३३२ (सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे) ३४१ (चुकीच्या पद्धतीने रोखणे) १४३,१४७ आणि १४९ (दंगल घडवून आणणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mihir Kotecha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.