माँसाहेब आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करत Rahul Shewale यांनी केली प्रचाराची सांगता

182
माँसाहेब आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करत Rahul Shewale यांनी केली प्रचाराची सांगता

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचारांची सांगता शनिवारी पार पडली असून दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या आशीर्वाद यात्रेत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. आशीर्वाद यात्रेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, अभिनेते गोविंदा यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेचे शिवसेना भवनसमोर मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील प्रवेशद्वाराजवळील स्वर्गीय माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांसह शेवाळे (Rahul Shewale) यांनी पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात चाफ्याचा पुष्पहार अर्पण करत त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांचा आशिर्वाद घेतला. (Rahul Shewale)

दक्षिण मध्य मुंबईतील लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या आशीर्वाद यात्रेला चेंबूरच्या पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून शनिवारी सुमारे साडे अकरा वाजता सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. चेंबूरहून निघालेली ही आशीर्वाद यात्रा सुमन नगर मार्गे शीव, धारावी ९० फीट रोड, जी.टी.बी रेल्वे स्टेशन, वडाळा, टिळक पूल मार्गे प्लाझा सिनेमा आणि त्यानंतर शिवसेना भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर सांगता झाली. (Rahul Shewale)


(हेही वाचा – कुर्ल्याचा अमान शेख पाकिस्तान गुप्तचर संघटनेचा हस्तक; NIAने काय म्हटले पुरवणी आरोपपत्रात?)

या आशीर्वाद यात्रेमध्ये जागोजागी फुलांचा वर्षांवर करण्यात येत होता, काही ठिकाणी जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. तर दादर शिवाजी मंदिर परिसरात ही रॅली आली असता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर भाजपाच्यावतीने आकर्षक पुष्पवृष्टी करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना भवनसमोरील जागेत आमदार सदा सरवणकर यांच्याकडून प्रतिकात्मक धनुष्यबाणाचे चिन्ह भेट देण्यात आले आणि शिवसेनाभवनसमोरच धनुष्यबाण मुख्यमंत्र्यांनी उचलून दाखवले. त्यामुळे माध्यमांच्या चित्रणामध्ये शिवसेना भवन आणि धनुष्यबाण हेच दिसत होते. त्यामुळे शिवसैनिकांनी एकच घोषणाबाजी केली होती. (Rahul Shewale)

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि अन्य मान्यवरांनी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून आशीर्वाद घेतला. तत्पूर्वी माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करत त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यामुळे या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांचा आशीर्वाद घेत या प्रचाराची सांगता करण्यात आली. दरम्यान, या आशीर्वाद यात्रेत टप्प्या टप्प्यावर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेलवन, आमदार सदा सरवणकर, आमदार मनीषा कायंदे भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, माजी आमदार तुकाराम काते, मनसे नेते नितीन सरदेसाई व संदीप देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, आरपीआयचे सिद्धार्थ कासारे, यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. आशीर्वाद यात्रेत संवाद साधताना राहुल शेवाळे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात मी केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास कायम ठेवून पुन्हा एकदा जनता दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीला विजयी करेल, याची मला खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Rahul Shewale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.