देशभरात १८व्या (Lok Sabha Election 2024) लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. राज्यात १३ मेपर्यंत चार टप्प्यातील निवडणूक पूर्ण झाल्या असून, अंतिम पाचव्या (5th Phase Election) टप्प्यातील प्रचार शनिवार, १८ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता थांबल्या. या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबईसह राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी २० मे रोजी मतदान होणार आहे.
येत्या सोमवारी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर – पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा १३ मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. तर मुंबई उत्तर मतदार संघातून १९, मुंबई उत्तर पश्चिममधून २१, मुंबई उत्तर पूर्वमधून २०, मुंबई उत्तर मध्यमधून २७. मुंबई दक्षिणमधून १५ आणि मुंबई दक्षिण मतदारसंघातून १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर या सहा (Mumbai Lok Sabha Election) जागांवरून सुमारे १२० उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
१३ मतदारसंघातील उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे –
मुंबईतील ६ जागांवर कोणाला उमेदवारी?
- दक्षिण मुंबई – अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव
- दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई
- उत्तर मुंबई – पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील
- उत्तर मध्य मुंबई – उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड
- उत्तर पूर्व मुंबई – मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील
- वायव्य मुंबई – रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर
(हेही वाचा – PM Narendra Modi यांना हरवण्यासाठी मुस्लिम वाढवत आहेत उबाठा शिवसेनेची ताकद, परिधान केल्या भगव्या टोप्या)
धुळे लोकसभा
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाच्या सुभाष भामरे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीमधून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्या विरुद्ध लढत होणार आहे.
दिंडोरी लोकसभा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाच्यावतीने भारती पवार यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नाशिक लोकसभा
नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाचे हेमंत गोडसे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या उबाठाकडून राजाभाऊ वाजे तसेच अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
पालघर लोकसभा
पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाच्यावतीने हेमंत सावरा यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या उबाठाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
भिवंडी लोकसभा
भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाच्यावतीने कपिल पाटील यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्यात मतदानासाठी लढत होणार आहे.
कल्याण लोकसभा
कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेच्यावतीने श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या उबाठागटाकडून वैशाली दरेकर राणे यांच्यात मतदानासाठी लढत होणार आहे.
ठाणे लोकसभा
ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेच्या वतीने नरेश म्हस्के यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या उबाठा गटाकडून राजन विचारे यांच्यात लढत होणार आहे.
(हेही वाचा – Drop Box मधून चेक चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेकडून अटक)
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र व राज्यातील प्रमुख मंत्री तसेच विविध पक्षांचे नेते नाशिकमध्ये ठाण मांडून होते. यावेळी संबंधित नेत्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार रॅली, सभा, रोड शो, कॉर्नर सभा तसेच वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या. या दरम्यान, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात आले. त्यामुळे राजकीय वातावरण तापून निघाले. तर सामान्य मतदारांचे चांगलेच राजकीय मनोरंजन झाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community