उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Aadityanaath) यांनी मुंबईला लागून असलेल्या पालघर लोकसभा (Palghar Loksabha Election) मतदारसंघात जनतेला संबोधित केले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचा भाग होईल, अशी मोठी घोषणा केली आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, पाकिस्तानची परिस्थिती वाईट आहे, ते पीओके हाताळण्यास सक्षम नाही आणि पीओकेच्या लोकांना भारतात सामील व्हायचे आहे. योगी आदित्यनाथ यांनी जनतेला भाजपा उमेदवार हेमंत सावरा यांना मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य साकारत आहेत. असे विधान यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
(हेही वाचा – मुंबईला अतिरेक्यांच्या ताब्यात देण्याचा Uddhav Thackeray यांचा प्लॅन; दिपक केसरकर यांची घणाघाती टीका)
रामभक्तच राज्य करतील असे योगी आदित्यनाथ म्हणाले, भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले तर डोळे काढले जातील. या निवडणुकीत जनता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी सांगितले. योगी म्हणाले की, आता यूपीमध्ये रस्त्यावर कोणीही नमाज अदा करू शकत नाही, मशिदींमधून लाऊडस्पीकरही हटवण्यात आले आहेत. इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, जे पाकिस्तानचे गुणगान गातात त्यांनी तिथे जाऊन भीक मागावी. काशी आणि अयोध्येनंतर आता आम्ही मथुरेकडे वाटचाल करत आहोत, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.
(हेही वाचा – कुर्ल्याचा अमान शेख पाकिस्तान गुप्तचर संघटनेचा हस्तक; NIAने काय म्हटले पुरवणी आरोपपत्रात?)
दिल्लीच्या तख्तावर फक्त रामभक्तच राज्य करेल, असे ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले की, हे लोक म्हणायचे की भाजपावाले शंभर जन्म घेतले तरी राम मंदिर बांधू शकणार नाहीत. तेव्हाही आम्ही रामललाला, तिथे येऊन मंदिर बांधू, असे म्हणायचो. आम्ही जे सांगितले ते केले आणि ते दाखवून दिले. असे विधान योगीनाथ यांनी केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community