Monsoon Update: अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार! येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

185
India Monsoon : भारतात दरवर्षीच्या तुलनेत ८ टक्के जास्त पाऊस, २०२० नंतरचा सर्वोत्तम मान्सून

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम (Monsoon Update) आणखीच वाढणार असून येत्या शुक्रवारपर्यंत (२४ मे) अनेक भागात तुफान पाऊस कोसळणार (Monsoon Update) असा अंदाज हवामान विभागाकडुन वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात सर्वांत अधिक अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. (Monsoon Update)

कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार

मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट, तर कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती असल्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे, तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल. (Monsoon Update)

केरळमध्ये वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार ?

वायव्य बंगालच्या उपसागरात २२ मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी या दाबाचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊ शकते. या स्थितीची तीव्रता कायम राहिल्यास केरळमध्ये (Kerala Monsoon ) वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. (Monsoon Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.