उद्धव ठाकरेंच्या भाषणांमधून भगवा ध्वज गायब झाल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची सुप्र इच्छा होतीच, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं हे साफ खोटं आहे, असं एकनाथ शिंदे या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत. (CM Eknath Shinde)
ठाकरेंच्या मिरवणुकांमधून भगवा ध्वज गायब
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भगवा ध्वज जीव की प्राण होता. पण आज उध्दव ठाकरे यांच्या भाषणातून, प्रचारातून, मिरवणुकांमधून भगवा ध्वज गायब झाला आहे. विशिष्ट समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांना हिंदुत्व नकोसे झाले आहे. अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रविचाराने प्रेरीत असलेल्या संघटनेवर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. (CM Eknath Shinde)
आणखी किती लांगूलचालन करणार ?
“पाकिस्तानचा झेंडा प्रचार मिरवणुकांमध्ये नाचवायचा आणि भगव्याच्या नावाने बोटे मोडायची. द्रेशद्रोह्यांना निवडणूक प्रचारात फिरवायचे आणि देशभक्त संघटनांना शिव्याशाप द्यायचे. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसच्या गळ्यात गळे घालायचे. ठराविक व्होट बँकेची मतं मिळवण्यासाठी आणखी किती लांगूलचालन करणार?” असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे. (CM Eknath Shinde)
उद्धव काँग्रेससमोर लीन झाले आहेतच, लवकर विलीनही होतील
“शरद पवार यांनी काही दिवसांपुर्वी सर्व प्रादेशिक पक्ष या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य केले होते. नरेंद्र मोदी यांच्या विधानाला ही पार्श्वभूमी होती. शरद पवार (Sharad Pawar) काहीही म्हणोत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्ष आधीच काँग्रेसपुढे लीन केला आहे. उद्धव काँग्रेससमोर लीन झाले आहेतच, लवकर विलीनही होतील.” असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community