Lok Sabha Election 2024: मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने समजावून सांगितले तांत्रिक टप्पे

राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

287
Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, १३ जागांवर सोमवारी मतदान; कुणामध्ये होणार लढत?

देशभरात १८ व्या लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदानाची जय्यत तयारी सुरू असून, राज्यात चौथ्या टप्प्यापर्यंत मतदान पुणे झाले असून, अंतिम पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी म्हणजेच २० मे रोजी होणार आहे. दरम्यान, चौथ्या टप्प्यापर्यंत मतदान झाले असले तरी नागरिकांमध्ये मतदानाच्या वाढीबाबत अनेक चर्चा रंगत आहेत, यामध्ये मतदानाच्या टक्केवाढीत वाढ झालीच कशी? तसेच आधी एक आकडा सांगितला गेला मग आकडा वाढवून दिला गेला. असा एक मोठा आक्षेप मतदारांकडून घेतला जात आहे. यासंबंधी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer of the State) डॉ. किरण कुलकर्णी (Dr. Kiran Kulkarni) यांनी याबाबत एका वृत्तपत्राला सविस्तर माहिती दिली. 

(हेही वाचा – MC Stan Net Worth: आधी ‘धारावीचा रॅपर’ आणि आता ‘बिग बॉस – सिझन १६’ चा विजेता; एमसी स्टॅनची संपत्ती किती?)

चौथ्या टप्प्यापर्यंत मतदान झाले असले, तरी मतदारांमध्ये मतदान टक्केवाढी संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या संबंधित प्रश्नांबाबत चर्चा करत असताना, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी मतदारांना काही सूचना केल्या आहेत. यामध्ये मतदानाच्या टक्केवारीत होणारे बदल याबाबत चर्चा करताना सर्व मतदारांनी ही प्रक्रिया नीट समजावून घेऊन मगच त्यावर चर्चा करावी, तसेच अन्यथा एखादा गैरसमज, अफवा आणि अज्ञानाचे प्रदर्शन याशिवाय यातून काहीच हाती लागणार नाही, असे कुलकर्णी म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

मतदान टक्के वाढीबाबत नेमकी कारणं काय आहेत?

मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मतदानची वेळ सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजे पर्यंत ठेवली असली, तरी काही मतदान केंद्रावर रात्री उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया चालू असते. अशातच मतदान झाल्यावर सर्व मतदान यंत्रे मतदारसंघाच्या मुख्यालयात नेली जातात. अनेक ठिकाणी मतदान यंत्रे आणि संबंधित कागदपत्रे मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये (Strong room) पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा अगदी दुपारसुद्धा होते. दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी (Election Adjudicating Officer) आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व्होटर टर्नआऊट ॲपवर (Voter Turnout App) जाहीर करतात. परंतु ती  मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते.

(हेही वाचा – Cloudburst Rain: चिपळूणमध्ये पावसाचा कहर! अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस)

केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरून खात्री करून जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून व्होटर टर्नआऊट ॲपवर टाकली जाते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होऊन मतदानाची अंतिम टक्केवारी व्होटर टर्नआऊट ॲपवर प्रसारित होते. त्याला ‘एंड ऑफ पोल’ अंदाजित टक्केवारी म्हणतात. त्यासाठी “मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री” ही अंतिम समय मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. म्हणजे मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व अहवाल, कागदपत्रे तपासून आणि छाननी करून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते. तसेच काही मतदान केंद्रे दुर्गम भागात तसेच विधानसभा मुख्यालयापासून दूर असल्यामुळे तेथील मतदान पथकांना मुख्यालयी पोहोचण्यास उशीर होतो किंवा कधीकधी पाऊस अथवा वाहतुकीचा अडथळा यामुळे उशीर  होऊ शकतो.    

ॲपवरील टक्केवारी अंदाजेच
व्होटर टर्नआऊट ॲपवरील सर्व टक्केवारी अंदाजित असते. कारण, प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान संपते तेव्हा त्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी केंद्राध्यक्षांकडे आणि प्रत्येक मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी सुपुर्द केलेली असते. ती संख्या आणि टक्केवारी हा मूळ आधार असतो. एखाद्या राजकीय पक्षाने प्रतिनिधींकडून केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी याची तुलना केल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर झालेल्या टक्केवारीशी बहुतांश निश्चितपणे जुळेल. 

(हेही वाचा – Patanjali कंपनीच्या अडचणीत वाढ! सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई

टपाल मतमोजणी महत्त्वाची
व्होटर टर्नआऊट ॲपमध्ये अंतिम टक्केवारीला अंदाजित असेच म्हटले आहे. त्याचे कारण असे की, ही अंतिम टक्केवारी केंद्राध्यक्षांच्या डायरीशी आणि राजकीय अथवा उमेदवारांच्या मतदान केंद्रातील उपस्थित प्रतिनिधींकडे दिलेल्या संख्येशी जुळत असली तरी मतमोजणीच्या दिवशी त्यामध्ये टपाल मतदानाची संख्या समाविष्ट केली जाते. त्यामुळे मतदानानंतरची मतदानाची संख्या आणि एकूण टक्केवारी यांच्यात किंचित वाढ दिसून येते. त्यामुळे ॲपवर मतदानाच्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दिसणारी अंतिम टक्केवारी ही मतदान यंत्रावरील मतदानाची टक्केवारी असते असेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024) 

हेही पाहा –

             

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.